राज्यात फेरीवालाविरोधी मोहीम;अतिक्रमण हटवण्याकरिता एक महिन्याची मुदत- ममता बॅनर्जी

कोलकाता: फेरीवाल्यांना हुसकावून लावणे, हे पश्चिम बंगाल सरकारचे उद्दिष्ट नसल्याचे सांगत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी पदपथ आणि रस्त्यांवर केलेले अतिक्रमण हटवण्याकरिता एक महिन्याची मुदत दिली आहे. सध्या राज्यभरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांचे हे निवेदन आले आहे.

फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये या संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीने त्यांचा अहवाल १५ दिवसांत सादर करावयाचा आहे. बंगाल सरकारतर्फे राज्यात फेरीवाला क्षेत्रे निश्चित केली जातील, फेरीवाल्यांना सामावून घेण्यासाठी इमारती व त्यांचे सामान ठेवण्यासाठी गोदामे उभारली जातील आणि त्यांना ओळखपत्रे दिली जातील, असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Economic Survey Report: गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले, राज्यासाठी धक्कादायक बातमी; टॉप ५ मधून बाहेर फेकलो गेलो

‘मला कोणाचाही उत्पन्नाचा स्रोत हिरावून घ्यायचा नाही आणि कोणाला बेरोजगारही करायचे नाही. लाखो फेरीवाले त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर करतात. मात्र एक महिना कोणतीही अतिक्रमणविरोधी मोहीम चालवली जाणार नाही. या एका महिन्यात फेरीवाल्यांनी पदपथ मोकळे करावेत,’ असे बॅनर्जी यांनी नमूद केले.

‘आम्ही एक सर्वेक्षण करू. अधिकृत फेरीवाल्यांना कसे सामावून घेता येईल, याबाबत सरकार विचार करेल. गोदामेही उभारली जातील. परंतु रस्त्यांवर अतिक्रमणे होता कामा नये. जर नवीन फेरीवाले पदपथांवर अतिक्रमण करताना आढळले तर त्यांना अटक केली जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.
Chandrayaan-4: मिशन चांद्रयान-४ बद्दल मोठी अपडेट; भारत चंद्रावरून पृथ्वीवर आणणार ‘ही’ मौल्यवान गोष्ट

या बैठकीला वरिष्ठ मंत्री, सरकारी अधिकारी, पोलिस अधिकारी आणि सर्व महापालिकांचे महापौर व पालिका आयुक्त उपस्थित होते. रस्त्यांवर अतिक्रमण झाल्यास त्याला राजकीय नेते आणि पोलिस जबाबदार असतील, असेही त्यांनी ठणकावले. ‘नगरसेवकांनी सुरुवातीपासूनच यावर लक्ष दिले पाहिजे होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. जर, तुम्ही नवीन फेरीवाल्याला अतिक्रमण करण्यास मदत केली, तर तुम्हालाही अटक केली जाईल. त्या भागातील नेते पहिल्यांदा फेरीवाल्यांकडून पैसे घेतात आणि रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी परवानगी देतात. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करतात. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही,’ असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

‘ही सर्व आपली चूक’

याबाबत फेरीवाल्यांनाही दोष देता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या. ही सर्व आपली चूक आहे. आपण न्यू मार्केट परिसरात नवीन इमारती का उभारल्या नाहीत, फेरीवाले तिकडे स्थलांतरित झाले असते, अशा शब्दांत सरकारची चूक कबूल केली. न्यू मार्केट हा परिसर ब्रिटिश राजवटीत विकसित झाला आहे. त्याला पूर्वी हॉग मार्केट असे संबोधले जात होते. या बाजारात फेरीवाल्यांची खूप वर्दळ असते. ममता बॅनर्जी एका महिन्यात या सर्व परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांनी कोलकाता आणि परिसरात असलेले बेकायदा पार्किंग हटवण्याचेही आदेश दिले आहेत.

Source link

bengal cm mamata banerjeehawkers and encroachmentपश्चिम बंगालफेरीवालेफेरीवाल्यांचे अतिक्रमणमुख्यमंत्री ममता बॅनर्जी
Comments (0)
Add Comment