नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी ट्वीट करत घटनेवर सरकार बारीक लक्ष ठेवून असल्याचे नमूद केले इतकेच नव्हे तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
दिल्ली विमानतळावरील दुर्देवी अपघातानंतर काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये विमानतळाच्या छताचा भाग गाड्यांवर कोसळताना दिसतोय, या दुर्घटनेतून सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
दिल्ली इंटरनॅशनल एअर पोर्ट लिमिटेड (DIAL) च्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, “आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे, टर्मिनल १ नजीक असलेल्या जुन्या शेडचा एक भाग पहाटे 5 च्या सुमारास कोसळला. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत, आणि बचावकार्य सुरू आहे. टीम्स जखमींना मदत करत आहेत टर्मिनल 1 वरून सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी चेक-इन काउंटर बंद आहेत.
दिल्ली आणि नजीकच्या परिसरात कालपासूनच पावसाची संततधार दिसते तर काही ठिकाणी पाणी तुंबले आहे. अतिमुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीवर सुद्धा गंभीर परिणाम झाला आहे.स्पाइसजेटने विमानसेवा काही काळापुरती थांबवली आहे.