मीडिया रिपोर्टनुसार, स्पेसएक्स दोन्ही अंतराळवीरांना वाचवण्यासाठी पुढे येऊ शकते. परंतु स्पेसएक्सची मदत घ्यावी की नाही यावर नासाला निर्णय घ्यावा लागेल. एक पर्याय रशियाचा देखील आहे. जर रशियाशी बोलणी झाली तर त्यांच्या सोयुज स्पेसक्राफ्टमधून दोन्ही अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर येऊ शकतात. गेल्यावर्षी देखील रशियानं अशी कामगिरी केली होती.
सुनीता विलियम्स का गेल्या होत्या अंतराळात?
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोरनं 5 जूनला आयएसएसकडे झेप घेतली होती. दोन्ही बोइंगच्या स्टारलाइनरमध्ये बसून पोहचले होते. हा एक रियुजेबल स्पेसक्राफ्ट आहे, जो अंतराळात जाण्यासाठी आणि तिथून पुन्हा येण्यासाठी डिजाइन करण्यात आला आहे. मिशन 9 दिवसांचं होतं परंतु स्पेसक्राफ्टमधून हीलियम गॅस लीक होत असल्यामुळे स्टारलाइनरमध्ये बिघाड आला आहे. नासानं म्हटलं होतं की अंतराळवीर 26 जून परत येतील, परंतु असं होऊ शकलं नाही. आता 2 जुलै पर्यंत पुनरागमन होणे अपेक्षित आहे.
स्पेसएक्स करू शकते का मदत?
स्पेसएक्सला हे काम दिलं तर ते दोन्ही अंतराळवीर पुन्हा येऊ शकतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बोइंग आणि स्पेसएक्स एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. स्पेसएक्स दोन्ही अंतराळवीरना परत घेऊन येऊ शकते परंतु असं झाल्यास बोइंगच्या स्टारलाइनर प्रोजेक्टचं हे अपयश म्हटलं जाईल. बोइंगनं हे स्पेसक्राफ्ट निर्माण करण्यावर खूप वेळ आणि पैसे खर्च केले आहेत.
रशिया देखील करू शकते मदत
गेल्यावर्षी दोन रशियन अंतराळवीर देखील आयएसएसवर अडकले होते. त्यांच्या स्पेसक्राफ्टमधून कुलंट लीक झाला होता आणि ती समस्या ठीक होऊ शकली नाही. त्यानंतर रशियानं आपला दुसरा स्पेसक्राफ्ट पृथ्वीवरून पाठवला आणि अंतराळवीर पृथ्वीवर परतले.