पहाटेपर्यंत चालणारी नवी मुंबई मध्ये चालणारी छम�

मुंबई,दि.२८:- उल्हासनगरमधील अनधिकृत डान्सबारवर महापालिकेने कारवाई करण्यास आहे. यात श्रीराम चौकातील ऍपल आणि एंजल या दोन डान्सबारवर महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे.

यामुळे परिसरात पहाटेपर्यंत डान्सबारवर सुरु राहणारी छमछम आता बंद होणार आहे. या कारवाईमुळे उल्हासनगरातील अनधिकृत डान्सबार आणि पब चालकांचे धाबे दणाणले आहे.

उल्हासनगर शहरात अनेक डान्सबार असून पहाटेपर्यंत या डान्सबारमध्ये छमछम सुरू असते. या डान्सबारवर अनेकदा कारवाया होऊन देखील हे डान्सबार सर्रासपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत होतं. पुण्यातील ड्रग्स प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यासह संपूर्ण राज्यातील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशानंतर उल्हासनगर महापालिकेने उल्हासनगर शहरातील सर्व बारची कागदपत्रांची तपासणी करत कारवाई सुरवात केली आहे.

महापालिकेने कागदपत्र तपासणी करत आणि परवानगी यांची पडताळणी केली. त्यात अनधिकृत आढळून आलेल्या श्रीराम चौकातील ऍपल आणि एंजल या दोन डान्सबारवर धडक कारवाई सुरू करण्यात आली. उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस आणि सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई सुरू केली. शहरातील इतरही बारची कागदपत्रे मागवली असून त्यात जे बार अनधिकृत आढळतील त्यांच्यावर धडक कारवाई केली जाईल; अशी माहिती उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.
तसेच लवकर नवी मुंबईतील पहाटे पर्यंत चालू आसलेल्या डान्सबार वर हि लवकर कारवाई होणार आहे

Comments (0)
Add Comment