यल्लम्मा देवीचे दर्शन घेवून भाविकांची बस सौंदत्ती वरुन निघाली होती. पण मध्यरात्रीच बसवर काळाने घाला घातला, सारे झोपेत असतानाच त्यांना मृत्यूने कवटाळले. कर्नाटकमधीस हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी तालुक्यात मिनी बसने रस्त्याचा बाजूला उभ्या असणाऱ्या ट्रकला मध्यरात्री धडक दिली. सारे भाविक शिवमोगा येथील राहणारे आहेत असे पोलिसांनी सांगितले. जखमी सु्द्धा गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरवर्षी हजारो भाविक सौंदत्तीला यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जात असतात.
पोलिसांच्या अनुमानानुसार बसचालकाला झोप आल्याने हा अपघात घडला असावा असे सांगण्यात येते, बस चालकाला डोळा लागताच त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि त्यानी गाडी रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या बंद ट्रकवर आदळला असे पोलिसांनी अनुमान लावले.
सकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. बस चालकाला अचानक डोळ्यावर झोपेची झापड आल्याने त्याने बस उभ्या असलेल्या ट्रकला मागून ठोकली, पण मागून बसने धडक दिल्याने बसचा पुढचा भाग मोठ्या प्रमाणात चिरडला गेला. यामुळे पुढे बसणाऱ्या प्रवाशांचा मृतदेह बस आणि ट्रकच्या नुकसानग्रस्त भागात अडकून पडले, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन तातडीने दाखल झाले पण बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली. बसमध्ये एकूण १७ जण भाविक होते, त्यातील ११ जणांनी जागीच जीव सोडला दोन जणांनी रुग्णालयात जीव सोडला. शिवगोमा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील एम्मीहंटी गावातील सगळे भाविक होते, १३ जणांच्या अश्या अचानक मृत्यूने गावावर शोककळा पसरले, यात एका लहान मुलाचा सु्द्धा समावेश आहे.