भारती एअरटेलनं म्हटलं आहे की भारतात टेलीकॉम कंपन्यांचे बिजनेस मॉडेल आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी प्रति युजर सरासरी महसूल (ARPU) 300 रुपयांपेक्षा जास्त असला पाहिजे. आमच्या मते ARPU ची ही लेव्हल नेटवर्क टेक्नॉलॉजी आणि स्पेक्ट्रममध्ये आवश्यक गुंतवणूक करण्याच्या कामी येईल आणि गुंवणूकीवर काही परतावा मिळवून देईल. एअरटेल 3 जुलैपासून आपले मोबाइल टॅरिफ बदलेल. यात आम्ही बजेटमध्ये टेलीकॉम प्लॅन वापरणाऱ्या युजर्सवर कमी बोझा यावा म्हणून एंट्री लेव्हल प्लॅन्सच्या किंमतीत तुलनेने कमी वाढ केली जाईल, याची काळजी घेतली आहे.
एअरटेलनं अनलिमिटेड व्हॉइस प्लॅनच्या किंमती वाढवल्या
एअरटेलनं 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन वाढवून 199 रुपये, 455 रुपयांचा प्लॅन वाढवून 599 रुपये आणि 1,799 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन वाढवून 1,999 रुपये केला आहे.
एअरटेलनं डेली डेटा प्लॅनच्या किंमतीत केली वाढ
एअरटेलनं 265 रुपयांची प्लॅनची किंमत 299 रुपये केली आहे. 299 रुपयांचा प्लॅन आता 349 रुपयांमध्ये मिळेल. 359 रुपयांचा प्लॅनसाठी 409 रुपये मोजावे लागतील. तसेच 399 रुपयांचा प्लॅन 449 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 479 रुपयांच्या प्लॅनची किंमत 579 रुपये झाली आहे, 549 रुपयांचा प्लॅनची किंमत 649 रुपये, 719 रुपयांचा प्लॅनची किंमत 859 रुपये, 839 रुपयांचा प्लॅनची किंमत 979 रुपये आणि 2,999 रुपयांच्या प्लॅनची किंमत 3,599 रुपये करण्यात आली आहे.
डाटा अॅड ऑन प्लॅन देखील महागले आहेत
डाटा अॅड ऑन वाले प्लॅन ज्याची सुरुवात फक्त 19 रुपयांपासून होते, ते आता 22 रुपयांमध्ये मिळतील. यात एक दिवसांच्या वैधतेसह 1GB डेटा दिला जात आहे. 29 रुपयांचा प्लॅन आता 33 रुपयांमध्ये मिळेल आणि 65 रुपयांचा प्लॅनसाठी आता 77 रुपये द्यावे लागतील.
रिलायन्स जियोनं गुरुवारी टॅरिफमध्ये बदल करण्यासह नवीन अनलिमिटेड प्लॅन लाँच करण्याची घोषणा केली आहे. जियोनं मोबाइल टॅरिफमध्ये 12-25 टक्क्यांची वाढ केली आहे, अडीच वर्षांनी ही दरवाढ झाली आहे.