Precious Treasure : होमगार्ड ऑफिसमधील जुन्या बॉक्समध्ये सापडला प्राचीन खजिना; पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का

गांधीनगर: गुजरातच्या भुजमध्ये होम गार्ड कार्यालयात प्राचीन काळातील मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत. जुन्या झालेल्या खोक्यात एक प्राचीन काळातील वस्तू आढळल्या. टेबलला लावण्यात आलेली कुलूप तोडल्यानंतर या वस्तू सापडल्या. हा बॉक्स २००१ मध्ये झालेल्या भूकंपावेळी सापडला होता. हा बॉक्स सरकारकडे जमा करण्यात आला आहे. बॉक्समध्ये आढळलेल्या वस्तू राजा महाराजांच्या काळातील आहेत.

भुजमध्ये महादेव गेट परिसरात कित्येक वर्षांपूर्वी तहसीलदार कार्यालय होतं. आता तिथे जिल्हा आणि होम गार्डचं कार्यालय आहे. या ठिकाणी अनेक दशकांपूर्वीचा खजिना सापडला आहे. ऐतिहासिक वस्तू पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कमांडंटकडून वापरल्या जाणाऱ्या टेबलमध्ये चांदीच्या जुन्या वस्तू सापडल्या.
दारुचा गुत्ता लवकर बंद झालाय! मद्यपीचा भाजप खासदाराला मध्यरात्री फोन; संवाद सुरु अन् मग…
जिल्हा होम गार्ड कमांडंट मनीष बारोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी टेबलसारख्या दिसणाऱ्या मोठ्या बॉक्सचं कुलूप तोडण्यात आलं. त्यामध्ये कित्येक दशकं जुन्या वस्तू आढळून आल्या. मी याची माहिती प्रांतीय अधिकारी अनिल यादव यांना दिली. त्यानंतर तहसीलदारांनी तपासाचे आदेश दिले.
दाम्पत्याचे शरीरसंबंध, चोराकडून गुपचूप VIDEO शूट; व्हॉट्सऍपवर पाठवून ब्लॅकमेलिंग अन् मग…
तहसीलदार पाहण्यासाठी पोहोचले. प्राचीन वस्तू बघून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. २००१ मध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी हा बॉक्स एकानं जमा केला होता, अशी माहिती तपासातून उघडकीस आली. या बॉक्समध्ये चांदीच्या जुन्या वस्तू आहेत. त्या अतिशय मौल्यवान आहे. राजा महाराजांच्या काळातील वस्तू जिल्हा खजिनदारांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

Source link

gujarat newsprecious treasuretreasure foundकच्छ न्यूजगुजरात न्यूजचांदीचा खजिनाप्राचीन खजिना सापडलामराठी न्यूजमौल्यवान खजिनाहोमगार्ड ऑफीस
Comments (0)
Add Comment