पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी चोरीचे गुन्हे…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

संशयीतांना ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे….

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाईकवाडी, बांग्लादेश चौकी जवळ, नागपुर येथे राहणारे  सागर शंकरलाल तेलघरे, वय ६५ वर्षे, यांनी पोलिस स्टेशन पाचपावली येथे तक्रार दिली की  दिनांक १५.०६.२०२४ चे रात्री ९.४५ वा. ते रात्री ११.४५ वा. चे दरम्यान  त्यांची लाल रंगाची हिरो प्लेझर मोपेड क्र. एम.एच. ३१ डि.ए. ७०२० किंमत अंदाजे १५,०००/- रू. आनंद प्रल्हाद लॉन,टेकानाका टि-पॉईंट चे पार्कीगमध्ये हॅन्डल लॉक करून हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने  गाडी चोरून नेली. अशा  दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासात पोलिस स्टेशन  पाचपावली येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, त्यांनी आरोपी क्र. १) समीर पठान उर्फ सुरेश सकुर पठाण, वय २५ वर्षे, रा. टेका नाका यादव चा तबेला, कपील नगर, नागपुर यांस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने दारूचे व्यसनामुळे नमुद वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्याची अधिक विचारपुस केली असता, आरोपीने वर नमुद मोपेड हि आरोपी क्र
२) अमीर खान कादर खान, वय ३२ वर्षे, रा. महेंद्र नगर, पाण्याचे टाकीजवळ यांस विकल्याचे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेवुन लाल रंगाची हिरो प्लेझर मोपेड क्र. एम.एच. ३१ डि.ए. ७०२० किंमती अंदाजे १५,०००/- रू. ची जप्त करण्यात आली. आरोपी क्र १ याची अधिक सखोल विचारपुस केली असता, त्याने पोलिस स्टेशन यशोधरानगर हद्दीतुन काळया रंगाची होंडा डिओ मोपेड क्र. एम. एच. ४९ ए. ए. ४०५२ किंमत अंदाजे ५५,००० /- रू. ची व
सिल्व्हर रंगाची हिरो स्प्लेंडर क्र. एम. एच. ४९ ए. एस १७३३ किंमत अंदाजे ४०,००० /- रू. ची असे ०२ वाहने, जरीपटका हद्दीतुन निळया रंगाची हिरो स्प्लेंडर क्र. एम. एच. ३१ डि.जे. ४७९६ किंमत अंदाजे ५०,००० /- रू.ची,कपील नगर हद्दीतुन होंडा अॅक्टीव्हा ग्रे रंगाची एम. एच. ४९ के ७४३४ किंमत अंदाजे ४५,००० /- रू. ची, असे एकुण ०५ वाहने चोरी केल्याची कबुली दिली.आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेले ०४ दुचाकी वाहने व एका वाहनाचे स्पेअर पार्ट्स असा एकुण किंमती अंदाजे २,०५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी  पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (उत्तर विभाग)प्रमोद शेवाळे,पोलिस उप आयुक्त (परि. क्र. ३)गोरख भामरे,सहा. पोलीस आयुक्त (लकडगंज)श्वेता खाडे,यांचे
मार्गदर्शनाखाली, वपोनि. पाचपावली  बाबुराव राऊत, सपोनि. सोमवंशी, पोहवा. दिलीप पवार, प्रकाश पठाण,वासुदेव जयपुरकर, छगन शिंगणे, नापोशि अंकुश राठोड, गणेश ठाकरे, पोशि हितेश फरकुंडे व महेंद्र शेलोकार यांनी केली.

Comments (0)
Add Comment