गावकऱ्यांनी मुलाला नदीच्या काठावर आणले तर तातडीने पोलिसांना गावकऱ्यांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी काहींच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढले. पण पोलिसांनी नेमका प्रकारचा छडा लागेना, अखेर पोलिसांनी लहान मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी मुलाला केला, थरथरत्या आवाजात मुलाने ‘आईने केले’ असा खुलासा केला. या खुलासामुळे पोलिस अधिकारी आणि गावकरी आश्चर्यचकित झाले.
पोलिसांनी मुलाल ताब्यात घेत कसून चौकशी केली, मुलाने खुलासा केला त्याचे चार भाऊ असून त्यांच्या आईने तिघांना नदीत बुडवले म्हणजेच नदीत सापडलेले मृतदेह हे त्याचे लहान भाऊ होते. पण पोलिसांना दोनच मृतदेह पहिल्यांदा भेटले तिसऱ्या मुलाची शोधमोहीम सुरू झाली काही तासांनंतर त्याच नदीत एका 2 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला. तीन मृतदेह सापडले आणि चौथे मूल साक्षीदार म्हणून उभे राहिले तरी पोलिसांना आईच्या ठावठिकाणाबाबत प्रश्न निर्माण झाले. मुलाच्या माहितीच्या आधारे, पोलिसांचे पथक मुलाने सांगितलेल्या त्यांच्या मूळ गावी गेले आणि प्रियंका नावाच्या महिलेला अटक केली.
तपासात आणखी एक नवी कहाणी उलगडली. प्रियांकाची चौकशी पोलिसांनी सुरु केली. सुमारे 30 वर्षांची प्रियंका औरैया येथील बरुआ गावची आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी, तिने लुहिया गावातील अवनीश सोबत लग्न केले आणि त्यांना चार मुले होती. सोनू (8), माधव (6), आदित्य (5) आणि मंगल (2), सुमारे दोन वर्षांपूर्वी अवनीशचे निधन झाले आणि याच काळात प्रियांकाने तिचा चुलत दिर आशिषसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले.
प्रियंका ,तिची सासू आणि तिची चार मुले आणिआशिष यांच्यासोबत औरैया येथे भाड्याच्या घरात राहायला गेली. नोकरीला नसलेला आशिष अधूनमधून सलूनमध्ये काम करत असे, तर प्रियांकाच्या सासूबाई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरकाम करत. आशिषने चार मुलांची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने प्रियांका आणि आशिषमध्ये वाद निर्माण झाला होता. त्याने अल्टिमेटम दिला “एकतर त्यांना माहेरी सोड किंवा त्यांना मारून टाका.” बुधवारी रात्री प्रियांका आणि आशिषमध्ये बाचाबाची झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियंका आपल्या आईला भेटायला जात असल्याचा दावा करून आपल्या मुलांसह घरातून निघून गेली.
त्यांच्या प्रवासादरम्यान प्रियांकाने मुलांना नशा असलेली बिस्किटे खायला दिली आणि केशमपूर घाटावर नेले. घाटावर जावून तिने तिच्या आईला कॉल केला आणि स्वतःला आणि मुलांसोबत संपवून टाकणार आहे अशी धमकी दिली. नशेच्या औषधाचा परिणाम मुलांवर होऊ लागला. प्रियांकाने प्रथम मंगलला नदीत फेकले, त्यानंतर आदित्य आणि माधव. शेवटी, तिने तिचा मोठा मुलगा सोनू याला बुडवण्याचा प्रयत्न केला, पण सोनूला बिस्कीटातून नशा झालीच नव्हती, त्याने पोहत गाव गाठले आणि गावकऱ्यांची मदत घेतली त्यामुळेच क्रूर आईला शिक्षा झाली.
या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी प्रियंका आणि तिचा चुलत दिर आशिष या दोघांनाही अटक केली आहे. दरम्यान, आपल्या भावांच्या मृत्यूचा साक्षीदार असलेला आठ वर्षांच्या सोनू यासाऱ्या प्रकरणामुळे पूर्णपणे निराशेच्या छायेत गेलाय.