‘कल्की’ची जादू ओसरतेय? दुसऱ्या दिवशी ३० कोटींनी घटली कमाई, किती झालं एकूण कलेक्शन?

मुंबई-गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘ॲनिमल’च्या यशस्वी सिनेमांनंतर, ‘कल्की 2898 एडी’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या त्या सिनेमांप्रमाणेच यावेळीही बॉक्स ऑफिसवर गर्दी पाहायला मिळते. २०२४ च्या सुरुवातीपासूनच, थिएटर मालक प्रेक्षकांची गर्दी ओढून आणेल अशा एका सिनेमाची वाट पाहत होते. प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण स्टारर या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया.Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या घरी हा मराठी शो रोज पाहिला जातो, बिग बींनी या मराठी कलाकाराचे घेतलेले आशीर्वाद
सुमारे ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट जगभरात सुमारे ८५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात सुमारे १७५ कोटी रुपयांची कमाई केली, तर भारतात ९५.३० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही सिनेमाची कमाई चांगली होती पण पहिल्या दिवसाच्या तुलनेत ती थोडी कमी झाली.

दुसऱ्या दिवशीची ‘कल्की 2898 एडी’ची कमाई

sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जवळपास ५४ कोटींची कमाई केली आहे. सिनेमाची सर्वाधिक कमाई तेलुगू भाषिक सिनेमातून झाले. त्यापाठोपाठ हिंदी भाषेतील व्हर्जनचा नंबर लागतो. भारतात आतापर्यंत या सिनेमाने सुमारे १४९.३ कोटींची कमाई केली आहे.

Madhuri Dixit : ज्या पाकिस्तानी व्यक्तीला भारत सरकारने Black List केलं त्याच्याशीच माधुरीची हातमिळवणी, होतेय प्रचंड ट्रोल
‘कल्की 2898 AD’ ची जगभरातील कमाई?

या चित्रपटाने आतापर्यंत तेलुगूमध्ये ९१.४५ कोटी रुपये, हिंदीमध्ये ४५ कोटी रुपये, तामिळमध्ये ८ कोटी रुपये, कन्नडमध्ये ६५ लाख रुपये आणि मल्याळममध्ये ४.२ कोटी रुपयांची कमाई केली. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट लवकरच जवळपास २५० कोटींचा आकडा पार करेल अशी चिन्ह आहेत.

‘कल्की 2898 इ.स.’ ची स्टोरी

दिग्दर्शक नाग अश्विन यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट भगवान विष्णूच्या आधुनिक अवतारावर आधारीत आहे, जगाला वाईटापासून वाचवण्यासाठी हा अवतार येतो. चित्रपटाची सुरुवात महाभारताच्या पार्श्वभूमीवर होते. रणांगणात भगवान श्रीकृष्ण अश्वत्थामाला (अमिताभ बच्चन) तो कधीही मरणार नाही असा शाप देतात. त्यानंतर तो अश्वत्थामाला प्रायश्चित्त करण्याची संधी देतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हजारो वर्षांनंतर जेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात फक्त वाईटच असेल, तेव्हा कल्की रुपात देवाचा अवतार जन्म घेईल पण तो जन्म रोखण्यासाठी आसुरी शक्ती सर्वतोपरी प्रयत्न करतील. तेव्हा अश्वत्थामाला या अवताराचे संरक्षण करुन आपली पापे धुण्याची संधी मिळेल..

Source link

bollywood moviesbollywood newsKalki 2898 adkalki 2898 ad box office collectionkalki 2898 ad box office collection day 2kalki 2898 ad latest newsकल्की 2898 एडी बॉक्स ऑफिस रिपोर्टबॉक्स ऑफिस कलेक्शनमराठी मनोरंजन विश्वहिंदी फिल्म
Comments (0)
Add Comment