B S Yediyurappa: पैसे देऊन केलं तोंड बंद? पोक्सो न्यायालयात येडियुरप्पांविरोधात ७५० पानी आरोपपत्र

वृत्तसंस्था, बेंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येड्डीयुरप्पा यांच्याविरोधातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी, बेंगळुरू येथील पोस्को जलदगती न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी पीडित मुलगी आणि तिच्या आईने तोंड बंद ठेवावे, यासाठी येडीयुरप्पा आणि अन्य तीन आरोपींनी त्यांना पैसेही दिले, असा आरोपही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘सीआयडी’ने आरोपपत्रात केला आहे.

काय आहे प्रकरण?
‘सीआयडी’ने ८१ वर्षीय येडीयुरप्पा यांच्यावर बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोस्को) कायद्यांच्या कलम ८ अन्वये लैंगिक हल्ला केल्याचा तसेच भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४अ अंतर्गत लैंगिक छळ, २०४ अंतर्गत पुरावे नष्ट केल्याचा आणि २१४अंतर्गत आरोपीच्या बचावासाठी भेटवस्तू, मालमत्ता देऊ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अरुण वाय. एम., रुद्रेश एम. आणि जी. मारीस्वामी या अन्य तीन आरोपींविरोधात भादंविच्या कलम २०४ व २१४अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.

आरोपपत्रानुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची आई आधीच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मदतीची विनवणी करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.१५वाजता येडीयुरप्पा यांच्या डॉलर कॉलनीतील घरी गेल्या होत्या. येडियुरप्पा यांनी मुलीला जवळच्या खोलीत नेऊन दार बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, नंतर आपल्या खिशातील काही पैसे मुलीच्या, तसेच तिच्या आईच्या हातात दिले, असे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतर मुलीच्या आईने २० फेब्रुवारी रोजी याबाबतचा एक व्हिडीओ फेसबुकवर टाकला. त्यानंतर अन्य तीन आरोपींनी तिच्या फेसबुक खात्यावरून तसेच आयफोनवरून व्हिडीओ डिलीट करण्यास भाग पाडले. रुद्रेशने पीडितेला दोन लाख रुपये दिले, असाही आरोप ठेवण्यात आला आहे.
Crime News : प्रियकरासाठी आईने पोटच्या तीन मुलांना क्षणात संपवले, घटनेने सारे हादरले
या प्रकरणी येडीयुरप्पा यांनी ‘सीआयडी’ने १७ जून रोजी चौकशी केली. दरम्यान, पीडितेच्या आईचे मागील महिन्यात कर्करोगामुळे निधन झाले.

Source link

cidIndian Penal Code 354 Akarnataka former cm yediyurappaKarnataka governmentminor girl molestedpocso casePOCSO Case Against BS Yediyurappaposco court
Comments (0)
Add Comment