रिलायन्स जिओ आणि एयरटेल नंतर तिसरी मोठी टेलीकॉम कंपनी असलेल्या वोडाफोन-आयडिया (VI) नं देखील आपल्या टॅरिफ प्लॅन्समध्ये दरवाढ केली आहे. विआयच्या वाढलेल्या किंमती 4 जुलैपासून लागू होतील. वोडाफोन-आयडियाचा बेसिक प्लॅन 179 रुपयांचा आहे, ज्याची आता किंमत वाढून 199 रुपये झाली आहेत. कंपनीनं आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये सुमारे 20 टक्क्यांची वाढ केली आहे. दिग्गज टेलीकॉम कंपनी रिलायन्स जियोनं सर्वप्रथम टॅरिफच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यानंतर एयरटेलनं आपल्या किंमती वाढवल्या. दोन्ही कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनचे नवे दर 3 जुलैपासून लागू होणार आहेत.
VI च्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती
सध्याची किंमत (रुपये) | नवीन किंमत (रुपये) | व्हॅलिडिटी (दिवस) | डेटा |
179 रुपये | 199 रुपये | 28 दिवस | एकूण 2GB |
459 रुपये | 509 रुपये | 84 दिवस | एकूण 6GB |
1799 रुपये | 1999 रुपये | 365 दिवस | एकूण 24GB |
269 रुपये | 299 रुपये | 28 दिवस | 1GB डेली |
299 रुपये | 349 रुपये | 28 दिवस | 1.5GB डेली |
319 रुपये | 379 रुपये | 30 दिवस | 2GB डेली |
479 रुपये | 579 रुपये | 56 दिवस | 1.5GB डेली |
539 रुपये | 649 रुपये | 56 दिवस | 2GB डेली |
719 रुपये | 859 रुपये | 84 दिवस | 1.5GB डेली |
839 रुपये | 979 रुपये | 84 दिवस | 2GB डेली |
विआयचे अॅन्युअल प्लॅन महागले
वोडाफोन आयडियाच्या अॅन्युअल प्लॅनची किंमत 2899 रुपये आहे. किंमतीत वाढ केल्यानंतर यांची किंमत 3499 रुपये आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवस आहे. यात रोज 1.5GB डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस मिळतात.
अडीच वर्षांनी झाली दरवाढ
सर्वप्रथम रिलायन्स जियोनं गुरुवारी टॅरिफमध्ये बदल केले. सोबतच कंपनीनं नवीन अनलिमिटेड प्लॅनची घोषणा केली आहे. कंपनीनं आपल्या टॅरिफ प्लॅन्समध्ये 25 टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. काही प्लॅन्ससाठी आता ग्राहकांना 600 रुपये जास्त खर्चावे लागणार आहेत. एअरटेलनं देखील एवढीच दरवाढ केली आहे. विशेष म्हणजे तिन्ही कंपन्यांनी जवळपास अडीच वर्षांनी एवढी मोठी दरवाढ केली आहे.