राहुल गांधींची खासदारकी घालवणारा नेता शाहांच्या भेटीला; चंद्रकांत पाटलांच्या जागी वर्णी लागणार?

Purnesh Modi : लोकसभा निवडणुकीनंतर गुजरातच्या राज्य कार्यकारिणीत मोठे बदल होणार आहेत. एककीडे दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने दिल्लीत राजकरण रंगले आहे तर गुजरातमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरुन रस्सीखेंच पाहायला मिळते. गुजरातचे काही ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष पदाची कमान मिळावी म्हणुन दिल्लीतून ताकद लावताना दिसतायत. नुकतेच माजी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते पूर्णेश मोदी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली, त्यांच्या भेटीच्या फोटोने नवे राजकरण रंगले आहे. चर्चा सुरु झालीय की राहुल गांधींची खासदारकी धोक्यात आणणारे पूर्णेश मोदींना गुजरात राज्याची धुरा सोपवण्यात येईल.

पूर्णेश मोदी गुजरातमधील ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींनी ‘मोदी आडनावावरुन केलेल्या विधानवरुन पुर्णेश मोदींनी गांधींनी थेट कोर्टात खेचले होते. पुढच्या आठवड्यात भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे अशातच जेपी नड्डा सोबतच्या पूर्णेश मोदीच्या फोटोमुळे चर्चांन उधाण आले. पुढच्या आठवड्याच बोटादमधील स्वामीनारायण मंदिरात प्रदेश कार्यकारिणीची बैठक ४ ते ५ जुलैदरम्यान पार पडेल. यावेळी पूर्ण शक्यता आहे की दिल्लीतून पूर्णेश मोदी यांच्याच नावाला पंसती दिली जाईल.

पूर्णेश मोदींची कारकीर्द

सूरत पश्चिमेतील पूर्णेश मोदी आमदार आहेत. भाजपाने जेव्हा विजय रुपानी यांना पदावरुन पायउतार केले होते तेव्हा भुपेंद्र पटेल यांच्यासोबत पूर्णेश मोदी कॅबिनेटमध्ये सहभागी होते. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांना पाहिले जाते. सूरतच्या राजकरणात त्यांनी बरीच मोठी पद भूषवलेत. आता भाजपचे असणारे प्रदेशध्यक्ष सी आर पाटील यांच्यासोबत पूर्णेश यादव यांचे संबंध फार चांगले नाहीत. आता भाजपा पुन्हा ओबीसी नेतृत्वाकडे गुजरातची धुरा देण्याची शक्यता आहे.

पूर्णेश मोदी यांच्यासोबत अनेक स्थानिक नेते सुद्धा गुजरातच्या प्रदेशध्याक्षच्या रेसमध्ये आहेत, यामध्ये राज्यसभेचे खासदार मयंक नायक, माजी केंद्रीय राज्यमंत्री देवू सिंह चौहान, अहमदाबादच्या वेजलपुरचे आमदार अमित ठाकरसहित अनेक दिग्गज नेते रिंगणात आहेत.

Source link

Chandrkant PatilGujratgujrat bjp presidentjp naddapurnesh modiअमित शाह आणि जेपी नड्डापूर्णेश मोदी फोटोपूर्णेश मोदी बॉयोग्राफीपूर्णेश मोदी भाजप नेता
Comments (0)
Add Comment