२९ जूनला शनि कुंभ राशीत वक्री होणार आहे. शनिवार हा वार शनिदेवाला प्रसन्न असून या दिवशी हा योगायोग जुळून आला आहे. शनि आपल्या मूळ त्रिकोण राशीत प्रतिगामी झाल्याने काही राशींवर त्याचा शुभ परिणाम राहिल.
२९ जूनपासून शनि मूळ कुंभ राशीत उलटा फिरल्याने १३९ दिवस या स्थितीत राहिल. शनि हा २९ जूनला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी वक्री होणार आहे. तर १५ नोव्हेंबरमध्ये कुंभ राशीत राहिल. शनीच्या हालचालीमुळे सर्व राशींना शुभ परिणाम मिळतली. त्यामुळे मकर आणि कुंभ राशींसह अनेकांना फायदा होईल. या काळात काही राशींना पैशांच्या तोट्यासह गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींवर शनी वक्रीचा काय परिणाम होईल ते पाहूया.
मेष राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – करिअरमध्ये प्रगती
मेष राशीत शनि अकराव्या स्थानात असल्याने करिअरसाठी हा काळ चांगला असणार आहे. नोकरीत अडथळे येत असले तरी चांगली प्रगती होईल. व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने तुम्ही समाधानी असाल. पैशांच्या बाबतीत हा काळ चांगला राहिल. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील. अंघोळीनंतर रोज ओम नमो नारायण मंत्राचा २१ वेळा जप करावा.
वृषभ राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – कामात अडथळे येतील
वृषभ राशीत शनि दहाव्या घरात वक्री होणार आहे. याच्या प्रभावामुळे तुम्हाला करिअर आणि कौटुंबिक बाबतीत काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीत कामाच्या ठिकाणी प्रेशर वाढेल. यामध्ये तुमचा वेळ आणि शक्ती वाया जाईल. व्यवसायात तुम्हाला विरोधकांकडून सामना करावा लागेल. कामात हातातून चांगल्या संधी गमवाल. पैशांच्या बाबतीत फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. रोज सूर्याला पाणी अर्पण करा
मिथुन राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – आर्थिक नुकसान होईल
मिथुन राशीच्या नवव्या घरात शनि वक्री होणार आहे. या काळात नशीब तुम्हाला फारसे साथ देणार नाही. तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. करिअरच्या दृष्टीने नोकरीतील चांगल्या संधी गमवाव्या लागतील. प्रतिष्ठा गमावल्यामुळे तुम्हाला निराशा वाटेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष राहाणार नाही. तुमचा नफा कमी होईल. आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने पायांचा वेदना उद्भवतील. पैसे जमा करु शकणार नाही. दर शनिवारी वाहत्या पाण्यात तीळ टाका.
कर्क राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – गुंतवणूक करा.
कर्क राशीत शनि आठव्या घरात वक्री होणार आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होईल. करिअरमध्ये अनपेक्षितपणे प्रगती होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित सर्व योजना यशस्वी होतील. तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा, हुशारीने गुंतवणूक करा. निष्काळजीपणे आर्थिक नुकसान होईल. वैयक्तिक संबंधामध्ये सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. दररोज दुर्गा चालीसाचे पठण करा
सिंह राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – अनावश्यक खर्च जास्त वाढेल
सिंह राशीत सातव्या घरात शनि वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला चांगले मित्र भेटतील. ज्यामुळे फायदा होईल. करिअरमध्ये काही कारणांमुळे नुकसान होऊ शकते. अचानक लांबचा प्रवास घडू शकतो. पैशांच्या बाबतीत आर्थिक नुकसान होईल. गुंतवणूक केलेले पैसे गमावू शकतात. अनावश्यक खर्च जास्त वाढेल. आजारामुळे तुम्ही त्रस्त राहाल. दर शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करा
कन्या राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – कर्ज घ्यावे लागेल
कन्या राशीच्या लोकांसाठी शनिचे संक्रमण कुंडलीतील सहाव्या घरात होणार आहे. त्यामुळे तुमच्यावर अशुभ प्रभाव पडू शकतो. तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. खर्च भागवण्यासाठी तुम्हाला कुठूनतरी कर्ज घ्यावे लागेल. ऑफिसमधील काही लोकांमुळे तुम्हाला बॉसची बोलणी खावी लागतील. व्यवसायात विरोधकांकडून आव्हान मिळेल. जास्त पैसे खर्च होतील. नुकसान होण्याची शक्यता आहे. रोज विष्णुसहस्त्रनामाचे पठण करा
तुळ राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – पैशांची कमतरता भासेल
तुळ राशीच्या लोकांसाठी शनि कुंडलीतील पाचव्या घरात वक्री होईल. हा काळ तुमच्यासाठी तणावपूर्ण असेल. भविष्याबद्दल तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहातील. करिअरमध्ये वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात यावेळी योग्य निर्णय न घेतल्याने चिंतेत सापडाल. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला पैशांची कमतरता जाणवेल. नातेसंबंधात अहंकाराची भावना निर्माण होईल. जोडीदाराशी भांडण होऊ शकते. आरोग्याच्या तक्ररारी उद्भवतील. रोज हनुमान चालीसाचे पठण करा
वृश्चिक राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – जबाबदाऱ्या वाढतील
वृश्चिक राशीच्या चौथ्या घरात शनि वक्री होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुटुंबाला अधिक वेळ द्यावा लागेल. तुमचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुम्हाला त्या योग्यरित्या पार पाडव्या लागतील. करिअरमध्ये दबाव वाढेल. व्यवसायात नोकरीच्या चांगल्या संधी गमवाव्या लागतील. व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते. नातेसंबंधात विवाद होतील. मतांच्या मतभेदामुळे वाद होतील. वाहन चालवताना काळजी घ्या. दर शनिवारी शमीच्या झाडावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
धनु राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – नात्यात मतभेद होतील
धनु राशीच्या तिसऱ्या घरात शनि वक्री होणार आहे. या काळात तुम्हाला आत्मविकासाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. प्रवास जास्तीचे घडतील. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सरासरी असेल. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागेल. प्रवासातून नफा मिळेल. कुटुंबातील अधिक जबाबदाऱ्यांमुळे तुमचा खर्च अधिक होईल. जोडीदारासोबत मतभेद होतील. नात्यातील आकर्षण कमी होऊ शकते. दर मंगळवारी लाल फळांचे दान करा
मकर राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – बचत कराल
मकर राशीत शनिचे वक्री होणे शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला बोलताना काळजा घ्यावी लागेल. करिअरमध्ये इच्छित बदल होऊ शकतात. तुम्हाला व्यवसायात कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला चांगली बचत करण्याची संधी मिळेल. नातेसंबंधांच्या आघाडीवर कुटुंबातील सदस्यांसोबत तणाव वाढू शकतो. परस्पर विवाद होऊ शकतात. दर शनिवार पिंपळाच्या झाडावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
कुंभ राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – आरोग्याच्या समस्या उद्भवतील
कुंभ राशीत शनि वक्री होणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळा तुमच्यासाठी चांगला आहे. या दरम्यान तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहात. तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळेल. अनपेक्षित स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. नातेसंबंधात जोडीदाराकडून समाधान मिळणार नाही. समन्वय चांगला राहाणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने पाठदुखी आणि पचनाच्या समस्या उद्भवतील. दर शनिवारी गरजू लोकांना मदत करा
मीन राशीवर शनि वक्रीचा प्रभाव – नोकरी बदलण्याचा विचार कराल.
मीन राशीत बारव्या घरात शनि उलटा फिरणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला प्रयत्नांची आणि अनुभवाची प्रशंसा होणार नाही. नोकरी बदलण्याचा विचार करु शकता. जुन्या रणनीतीमुळे कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. नातेसंबंधात जोडीदारासोबत समाधानी राहाणार नाही. नात्यात समन्वयाच्या अभावामुळे असू शकते. आरोग्याचीही काळजी घ्या. दर शनिवारी माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला.