बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील सव या गावातील नवसाला पावणारी जगदंबा माता म्हणून देवीची ख्याती आहे. त्यामुळेच नवरात्रीमध्ये मंदिरात इच्छापूर्ती झाल्यानंतर गेल्या सात वर्षापासून अखंडपणे चौदाशे दिव्यांची आरास लावली जाते. हे मंदिर हेमाडपंथी असून पूर्णपणे नदीच्या पात्रात दगडावर उभारलेले होते. मात्र, १९७५ साली आलेल्या महापुरामुळे हे मंदिर पूर्णपणे खचून, वाहून गेले.
गावकऱ्यांनी १९८३-८४ साली गावकऱ्यांनी या जगदंबा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. नवरात्रीमध्ये जगदंबा मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध ठिकाणावरून भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि देवीसमोर आपल्या मनोकामना सांगतात, नवस कबूल करतात, आणि इच्छापूर्ती झाल्यानंतर चैत्र महिन्यात आपला नवस फेडतात.
श्रद्धेने मंदिरातील देवीच्या मूर्तीसमोर गेल्या सात वर्षांपासून एक हजार चारशे नंदादीप जाळले जातात. देवीवर दिवसेंदिवस भाविकांची श्रद्धा वाढत असल्याने पुढच्या वर्षीची दिव्यांची नोंदणी या वर्षीच भाविक संस्थांकडेकरून ठेवत आहेत.