महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
अवैध रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यास भिवापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन १५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(२९)जुन चे १०.३० वा. दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना खबरीद्वारे गोपनीय माहीती मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा टाका येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे.
अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा टाका येथे पोलिस स्टाफ यांनी नाकाबंदी करून टिप्पर क्र. एम एच – ३६ / एए ४३५८ चा चालक आरोपी नितेश रमेश लसणे वय ३० वर्ष रा. पाहारणी ता. नागभिड जि. चंद्रपुर याने आपल्या वाहनात ०६ ब्रास रेती मालक २) सचिन सुनील बोकडे वय ३२ वर्ष रा. चिचाळा ता. भिवापुर जि नागपुर याचे सांगणे वरून वाळुची चोरीने उपसा करून चोरटी वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातून १) टिप्पर कं. एम एच ३६ / एए ४३५८ त्यामध्ये ६ ब्रास रेती कि.३०,०००/- रू. तसेच टिप्पर क्र. एम एच ३६ एए ४३५८ किंमत १५,००,०००/- रू असा एकूण १५,३०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी पो.स्टे. भिवापूर येथे आरोपीतांविरूद्ध कलम ३७९, १०९, ३४ भा.द.वी. सहकलम ४८ (७, )४८(८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१, ०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी,उमरेड राजा पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल, नापोशि रविंद्र जाधव,पोशि मनोज चाचेरे, पोशि दीपक ढोले, निकेश आरीकर यांनी केली. पुढील तपास पोहवा प्रविण जाधव हे करीत आहे.