डान्स बार व ऑर्केस्ट्रा बार वर कारवाई; मुख्यंमंत

मुंबई,दि.३०:- मुंबई प्रतिनिधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मीरा-भाईंदर महापालिकेने लेडीज डान्स बार व ऑर्केस्ट्रा बारच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. शनिवारी महापालिका आयुक्त संजय काटकर आणि पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी स्वतः रस्त्यावर उतरत २ ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त केले, तर काशीमीरा भागातील १५ बार – लॉजना पालिकेने कारवाईसाठी नोटिसाही बजावल्या आहेत.

नशेचा बाजार मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या आदेशानंतर मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी शहरातील ऑर्केस्ट्रा बार, लॉज आदींच्या अनधिकृत बांधकामांचा आढावा घेऊन कारवाईचे आदेश दिले. मीरा रोडच्या शीतलनगर येथील ऐश्वर्या, बिंदिया व टाइमलेस, कनकिया नाका येथील अंतःपुरा आणि नयानगरमधील आर के इन बार – लॉज अशा ५ बारच्या बेकायदा पत्रा शेड, बार, किचन आदी वाढीव अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. शुक्रवारी काशीमीरा महामार्गावरील संगीत ऑर्केस्ट्रा बार पूर्ण जमीनदोस्त केला.

दोन बार पूर्णपणे जमीनदोस्त
शनिवारी महापालिका आयुक्त संजय काटकर व पोलिस आयुक्त मधुकर पांडेय हे स्वतः कारवाईसाठी उतरले होते. काशीमीरा महामार्गावरील केम छो आणि एमपी पॅलेस हे दोन ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त केले. केम छो ऑर्केस्ट्रा बारचे थोडे वाढीव बांधकाम शुक्रवारी तोडले होते, परंतु बार पूर्ण जमीनदोस्त न केल्याबद्दल आरोप होऊ लागल्यानंतर शनिवारी तो पूर्ण तोडण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाडही उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment