मुंबई- ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या आणि हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेला नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५० कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी मात्र कमाई घसरली पण तिसऱ्या दिवशी मात्र विकेंडचा चांगलाच फायदा झाला.
‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात एकूण ९५ कोटी ३ लाख रुपये कमावले. या चित्रपटाचं तेलुगू भाषेत सर्वाधिक बुकिंग झालं असून हिंदी भाषेत २२ कोटी ५ लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत -३९.५६ टक्क्यांची घसरण झाली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत शुक्रवारी ५७ कोटी ६ लाखांचा गल्ला या चित्रपटाने जमा केला.
या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईमध्ये १६.४९ टक्क्यांनी वाढ झाली असून देशभरातील सर्व भाषांमध्ये एकूण कमाई ६७ कोटी १ लाख रुपये इतकी झाली आहे. तेलुगूमध्ये सर्वाधिक ३२ कोटी २५लाख, तमिळमध्ये ५कोटी, हिंदीमध्ये २७ कोटी आणि मल्याळममध्ये २ कोटी ४ लाख रुपयांची कमाई झाली आहे.
कल्की पुराण आणि भारतीय पौराणिक कथांवर आधारित असलेला ‘कल्की 2898 एडी’ या काल्पनिक चित्रपटाने आतापर्यंत एकूण २२० कोट्यवधींची कमाई केली असून तेलुगूमध्ये १२६ कोटी ९ लाख, तमिळमध्ये १२ कोटी ८ लाख, हिंदीमध्ये ७२ कोटी ५ लाख, कन्नडमध्ये १ कोटी १ लाख आणि मल्याळममध्ये ६ कोटी ७ लाख रुपयांची कमाई झाली आहे.
रिपोर्टनुसार, या चित्रपटाने परदेशातसुद्धा खळबळ उडवली आहे असून ३२० कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’, ‘मुंज्या’, ‘इश्क विश्क रिबाउंड’ आणि ‘हमारे १२’ या चित्रपटांना टक्कर देत आहे.
दरम्यान, ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हसन आणि दिशा पाटनी यांनी भूमिका साकारल्या आहेत.