अट्टल घरफोड्यास साथीदारासह ताब्यात घेऊन,उघड केले अनेक गुन्हे….


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

घरफोडया करणारा कुख्यात गुन्हेगार व त्याचा साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात…..

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांचे निर्देशानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर हटवार यांचे पथक चांदुर रेल्वे उपविभागातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आरोपींचा शोध घेत असता, दिनांक २९/०६/ २०२४ रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, अट्टल घरफोडया पंकज
गोंडाणे हा त्याचे एका साथीदारासह प्लेझर मोपेडवर नांदगांव खंडेश्वर हद्दीत फिरत आहे.

यामाहीतीवरुन स्थागुशा पथकाने खाजगी वाहनाने तात्काळ रवाना होवुन बातमीदाराकडुन प्राप्त माहितीवरुन नांदगांव खंडेश्वर हद्दीतील बस स्टॅंड ते पहुर रोडवरुन संशयीतरित्या प्लेझर मोपेड वर फिरणा-या दोन इसमांना ताब्यात घेवुन त्यांना नाव गांव विचारले असता, मोपेड चालक याने त्याचे पंकज राजु गोंडाणे वय ३० वर्ष धंदा मजुरी, रा. चौरे नगर, अमरावती ह.मु. खंडारे यांचे घरी, महसुल
कॉलनी, कारंजा ता. कांरजा जि. वाशिम असे सांगितले तसेच त्याचे मागे बसलेल्या इसमाने त्याचे नाव सागर जनार्दन गोगटे वय ३४ वर्ष धंदा मजुरी, रा. गांधी चौक, तुळजागीर वाडा, अमरावती ह.मु. खंडारे यांचे घरी, महसुल कॉलनी, कारंजा ता. कारंजा जि. वाशिम असे सांगितले. संशयितरित्या फिरणारे दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन घरफोडी संबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांनाही विश्वासात घेवुन कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता, त्यांनी मधील पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे, दत्तापुर, नांदगांव खंडेश्वर हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच नागपुर मधील पोलिस स्टेशन अजनी हद्दीतील घरफोडी व जरीपटका येथील वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
आरोपींनी दिलेल्या कबुलीवरुन अभिलेख पडताळणी केली असता १) पो स्टे चांदुर रेल्वे अप क्र. १२५ / २४ कलम ४५७, ३८० भादंवि, २) पो स्टे चांदुर रेल्वे अप क्र. ४००/ २४ कलम ४५७, ३८० भादंवि ३) पो स्टे चांदुर रेल्वे अप क्र. ४९०/२४ कलम ४५७, ३८० भादंवि ४) पो स्टे नांदगांव खंडेश्वर अप क्र. ९४ / २४ कलम४५४,४५७,३८० भादंवि ५)पो स्टे दत्तापुर अप क्र. २०३ / २३ कलम ४५७, ३८० भादंवि ६) पो स्टे अजनी, नागपुर शहर अप क्र ७३ / २४ कलम ४५७, ३८० भादंवि आणि ७) पो स्टे जरीपटका, नागपुर शहर अप क्र. ६०४/१५ कलम ३७९ भादंवि

याप्रमाणे एकुण ०७ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असुन आरोपीकडुन नमुद गुन्हयामध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी
१) एक  मोबाईल, किं  ५००/- रु. २) दोन वाहने, किं. ७५,०००/- रु आणि ३) नगदी १०,००० /- रु असा एकुण ८५,५००/- रु चा मुद्देमाल  जप्त करण्यात आला आहे. नमुद दोन्ही आरोपींचा पुर्वइतिहास पाहता, त्यांचेवर मालमत्ता चोरीचे बरेच गुन्हे नोंद असुन आरोपींकडुन घरफोडी तथा मोटर सायकल चोरीचे अधिक गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता असुन तुर्तास आरोपीस पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. चांदुर रेल्वे यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास चांदुर रेल्वे पोलिस करीत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस
अधिक्षक पंकज कुमावत यांचे निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पोउपनि सागर हटवार, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पोलिस अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, चालक अक्षय शेळके यांचे पथकाने व पो स्टे सायबर यांनी केली.

Comments (0)
Add Comment