New Criminal Laws: देशातील नव्या कायद्यानुसार झाली पहिली कारवाई, रेल्वे परिसरात गुटखा विकणाऱ्यावर झाली केस

नवी दिल्ली : भारतीय न्याय संहिता (बीएनएस) लागू होताच पहिलीच एफआयआर नोंदवण्यात आली आहे. मध्य दिल्लीच्या कमला मार्केट पोलीस ठाण्यात ही पहिली तक्रार नोंदवण्यात आली आहे. दिल्ली पोलीस रात्री उशिरा नवी दिल्ली रेल्वे स्थानक परिसरात पहारा देत असताना त्यांना याठिकाणी एक विक्रेता रस्त्याच्या मधोमध आपली हातगाडी लावून गुटखा आणि पाण्याच्या बॉटलची विक्री करत होता. जी गाडी नागरिकांच्या ये-जा करण्याच्या मार्गातील अडथळा ठरत होती. पोलिसांनी या विक्रेत्याविरोधात तात्काळ एफआयआर नोंदवला आहे.

रहदारीच्या रस्त्यावर लोकांना येण्या जाण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी अनेकवेळा रस्त्यावरील विक्रेत्यांना रस्ता मोकळा करण्याची ताकीद दिली होती. तरी विक्रेत्यांनी पोलिसांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच जागेवर ठाण मांडून आपला व्यवसाय करु लागले. यातील एका विक्रेत्याने असे करणे आपली मजबूरी असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या माणसाला त्याचे नाव आणि पत्ता विचारला. मिळा़लेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्या विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. नवीन कायद्याच्या कलम २८५ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. जी भारतीय न्याय संहितेअंतर्गत दाखल झालेली पहिलीच तक्रार ठरली आहे.
देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे; नव्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर…

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तीन नवे कायदे अंमलात

केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन भारतीय न्याय संहितेत बदल करून मंजूर केलेले तीन नवे कायदे सोमवारी १ जुलैपासून लागू झाले आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ असे नवे फौजदारी कायदे अंमलात येणार आहेत. १६३ वर्षांचा जुना कायदा बदलून या नव्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल डबल फायदा, पगारात होणार वाढ

नव्या कायद्यांमध्ये नेमका कसा आहे बदल

भारतीय न्याय संहितेमध्ये ३५६ कलमांचा समावेश आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामध्ये ५३३ कलमांचा आहे तर भारतीय साक्ष अधिनियम कलमांचा समावेश केला गेला आहे. जुन्या कायद्यांमध्ये आमुलाग्र बदल करुन या नव्या कायद्यांमध्ये गुन्ह्यासाठीची शिक्षा, शिक्षेची मुदत आणि दंडाच्या रकमेत देखील वाढ करण्यात आली आहे. यानुसार आता दिल्लीतील या विक्रेत्यावर नव्या न्याय संहितेअंतर्गत काय कारवाई केल जाणार हे पाहावे लागणार आहे.

Source link

First FIR in Indian judicial codeindia ka kanoonIndian Civil Defense CodeIndian Law StructureNew Criminal Lawनवे फौजदारी कायदेनव्या भारतीय कायद्यांची अंमलबजावणीभारतीय नागरी संरक्षण संहिताभारतीय न्याय संहिताभारतीय पुरावा कायदा
Comments (0)
Add Comment