पांढऱ्या थारवर लक्ष ठेवा! टिप मिळताच फिल्डिंग लावली; कार रोखताच पोलिसांना धक्काच बसला

गांधीनगर: गुजरातमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला दारु तस्करी प्रकरणात अटक झाली आहे. आरोपी महिला पोलीस गुजरातच्या सीआयडीमध्ये कार्यरत होती. दारु तस्करी करणारं वाहन पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यात महिला पोलीस कर्मचारी तस्करासोबत आढळून आली. पोलिसांनी वाहन रोखण्याचा प्रयत्न करताच कर्मचाऱ्यांना कारच्या खाली चिरडण्याचा प्रयत्न झाला.

आरोपी महिलेचं नाव नीता चौधरी असून ती पूर्व कच्छच्या सीआयडी शाखेत कार्यरत आहे. कच्छच्या भचाऊ जवळ एका पांढऱ्या रंगाच्या थारमधून काही जण दारुची तस्करी करणार असल्याची टिप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चक्रं फिरवली आणि तस्करांना अटक करण्यासाठी फिल्डींग लावली.
तीच तारीख, तीच पद्धत; ६ वर्षांनंतर बुरारीसारखी घटना; एकाच कुटुंबातील ५ जण मृतावस्थेत सापडले
खबऱ्याच्या टिपनंतर भचाऊ पोलिसांनी महामार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली. नाकाबंदी सुरु असताना पोलिसांना भचाऊच्या चोपडवा जवळ एक पांढऱ्या रंगाची थार दिसली. पोलीस थार जवळ पोहोचताच चालक कार पळवू लागला. त्यानं पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कसाबसा स्वत:चा जीव वाचवला. थार चालकानं कार वेगात पळवली. पण दुसऱ्या पोलिसांनी ती रोखली. पोलिसांनी कार तपासली. तेव्हा त्यांना धक्काच बसला.
बांधलेले हात, मिठी मारलेल्या अवस्थेत मृतदेह; ट्रेन समोर उडी घेत प्रेमी युगुलानं आयुष्य संपवलं
कारमध्ये दारु तस्कर युवराज सिंहसोबत महिला पोलीस कर्मचारी नीती चौधरीदेखील होती. नीता चौधरी पूर्व कच्छमधील गांधीधाममध्ये सीआयडी क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी कारमधून दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. चौधरीसोबत पकडण्यात आलेल्या दारु तस्कराविरोधात १६ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्यात हत्येच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी थार आणि त्यातील दारु जप्त केली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.

Source link

crime newsgujarat cidliquor smugglingliquor smuggling gujaratक्राईम न्यूजदारु तस्करीदारु तस्करी पोलीस अटकमहिला पोलिसाला अटकसीआयडी कर्मचारी अटकेत
Comments (0)
Add Comment