पहाटेपर्यंत चालणारे मुंबई मध्ये छमछम. हॉटेल व ब�

मुंबई,दि.०१:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यासह ठाणे, मुंबई येथील बेकायदेशीर हॉटेल आणि बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल रविवारी मुंबईतील काही हॉटेल आणि बारवर कारवाई करण्यात आली.

मुंबई पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे कारवाई दरम्यान आढळले. तर काही हॉटेल बारने अतिक्रम केलेले आढळले.

मुंबई पोलिस व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील चार बिअर बार व हॉटेलमध्ये अनधिकृतपणे मद्य आणि बारबालांवर बंदी असतांना देखील त्यांचा या हॉटेल बारमध्ये होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच हे हॉटेल अनधिकृतरित्या चालवले जात होते. तसेच कारवाई झाली तर बार गर्लला लपवण्यासाठी येथे खास जागा देखील केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी मुंबई पालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी मिळून चार हॉटेल बारवर छापा टाकला. या ठिकाणी अनेक बेकायदेशीर गोष्टी होत असल्याचे पथकाला आढळले. यानंतर काही जणांना ताब्यात घेऊन हे चारही हॉटेल आणि बार
बुलडोझरच्या साह्याने पाडण्यात आले आहे. हे बिअर बार व हॉटेल बेकायदेशीर कामांमध्ये गुंतले होते. या बाबतच्या अनेक तक्रारी पोलोसांना मिळाल्या होत्या. पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही या बारवर छापा टाकला तेव्हा काही छुप्या खोल्यामद्धे बार गर्ल्सना लपवण्यात आले होते. ग्रँट रोड येथील स्टर्लिंग बार आणि आर्यन बिअर बार, पूजा बार डीबी मार्ग आणि सांताक्रूझ पश्चिम येथील गझदर बँड मार्गावरील स्टार नाईट बारवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Comments (0)
Add Comment