अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर हिंगोली गुन्हे शाखेची कारवाई…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर हिंगोली गुन्हे शाखेची कारवाई…

हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची कार मधून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून १६ पेटी देशी दारू,आणि स्विफ्ट कार असा एकूण ५ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल हा जप्त करून मुद्देमाल घेऊन जाणारे आरोपी – १) ज्ञानेश्वर कांतराव चव्हाण (वय २५ वर्ष) २) सुदर्शन देविदास चव्हाण (वय २४ वर्ष) दोन्ही रा.आडगाव रंजे व नमुद मुद्देमाल ज्यांचे देशी दारू दुकानातुन व सप्लाय करीता काढुन देण्यात आले दुकानाचे मालक ३) सुरेशप्रसाद माणिकलाल जैस्वाल व काढुन देणारे ४) नंदकिशोर द्वारकादास जैस्वाल दोन्ही रा.वसमत या चार जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदयाच्या विविध कलमान्वये वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांचे आदेशाने व पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात (दि.२९जून) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे पथक रात्री दरम्यान पो.स्टे. वसमत शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, काही इसम ग्रामीण भागात अवैधरित्या व विनापरवाना विक्रीकरीता देशी दारूचे पेटया पार्सल घेऊन जात आहेत. अशा माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत शहरात कौशल्यपूर्वक गोपनीय पध्दतीने व साध्या वेशात सापळा रचुन एक स्वीफ्ट डीझायर कार क्र.एम.एच.३८७८७० हि पकडुन तपासणी केली असता त्यात १) १५ पेटी ज्यात १८० एम.एल. देशी दारू चे प्रत्येक पेटीत ४८ बॉटल असेलेले व ०१ पेटी ज्यात ९० एम.एल. देशी दारूचे १०० बॉटल असलेले असे एकुण १६ पेटी देशी दारू किंमत ७७,०००/- रू. व नमुद स्वीफ्ट कार किं.५,००,००/- रू. आदी माल विनापरवाना अवैध्यरित्या विक्रीकरीता घेऊन जाताना मिळून आला. ज्याची एकुण ५ लाख ७७ हजार रू. असून हा मुददेमाल जप्त करण्यात आला.

व नमुद दारूचा मुद्देमाल घेऊन जाणारे १) ज्ञानेश्वर कांतराव चव्हाण (वय २५ वर्ष) २) सुदर्शन देविदास चव्हाण (वय २४ वर्ष) दोन्ही रा.आडगाव रंजे व नमुद मुद्देमाल ज्यांचे देशी दारू दुकानातुन व सप्लाय करीता काढुन देण्यात आले दुकानाचे मालक ३) सुरेशप्रसाद माणिकलाल जैस्वाल व काढुन देणारे ४) नंदकिशोर द्वारकादास जैस्वाल दोन्ही रा.वसमत अशा ०४ इसमांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदयाच्या विविध कलमान्वये पोस्टे वसमत शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारे सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थागुशा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहा.पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, विठठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन यांनी केली.

Comments (0)
Add Comment