लोणावळ्यात पर्यटनस्थळावर सायंकाळी 6 नंतर ‘संचा�

पुणे ग्रामीण,दि.०१ लोणावळा: भुशी डॅम बॅकवॉटर परिसरात रविवारी घडलेल्या घटनेनंतर आज (सोमवार) पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेबाबत खेद व्यक्त करत जिल्हाधिकारी यांनी यापुढे लोणावळ्यात पर्यटकांना सायंकाळी सहा वाजताच्या नंतर पर्यटनस्थळावर बंदी घातली आहे.

त्याबाबतची नियमावली लवकरच काडली जाईल असेही त्यांनी सांगितले. लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचअनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे याठिकाणी सायंकाळी सहा नंतर पर्यटकांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कारवाईचा बडगा उगारला जाईल असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले.

Comments (0)
Add Comment