नेमके काय घडले?
राहुल गांधी भाजपवर टीका करत असताना भगवान शिवाचा वारंवार उल्लेख करताना आढळले. यावेळी संसदेचे अध्यक्ष ओम बिर्ला राहुल गांधींना म्हणाले “तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, आणि तुमच्याकडून सभागृहाची प्रतिष्ठा राखावी आणि नियमांचे पालन करावे अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही स्वतः शिवजींना देव मानता, त्यांचा येथे वारंवार उल्लेख करणे योग्य नाही. तुम्ही नियम पुस्तक वाचले तर. सभागृहात कोणतेही चित्र दाखवता येत नाही, असा नियम “ओम बिर्ला यांनी गांधींना वाचून दाखवला.
“स्पीकर साहेब, बघा, कॅमेरा दूर गेला आहे. थोड्या वेळाने गांधी पुन्हा म्हणाले बघा, कॅमेरा परत आला आहे माझ्यावर. तुम्ही पाहिलं का, सर? सर, मला फक्त सांगायचं आहे, संसदेत हे असे होणे बरोबर नाही.” जेव्हा राहुल गांधी शिवजी आणि इतर देवतांचे फोटो दाखवत होते तेव्हा संसदेतील कॅमेरा त्याच्यांवरुन काही काळासाठी हटवण्यात आला होता.
हाच प्रकार काँग्रेसने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून व्हायरल केलाय. ‘कॅमेरा की जादू’अश्या आशयाने काँग्रेसने हा व्हिडिओ व्हायरल केलाय. .याआधीसुद्धा जेव्हा राहुल गांधी विरोधी पक्षनेते नव्हते तेव्हा अनेकदा राहुल गांधी संसदेत बोलत असताना राहुल गांधींवरील कॅमेरा हटवण्यात आला होता असा काँग्रेसकडून आरोप करण्यात येतोय पण आता राहुल गांधींसोबत असेच करण्यात येत आहे असा नाराजीचा सूर काँग्रेसकडून दर्शवला जातोय.