महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
जळगाव मध्ये गुरे चोरणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद…
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलिसांनी अंतरराज्यीय गुरे चोरी करणाऱ्या टोळीतील 5 जणांना कौशल्यपूर्ण तपास, तांत्रिक विश्लेषण अन् मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शिताफीने अटक करून त्यांच्याकडून बोलेरो पिकअप आणि मोटारसायकल असा एकुण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी – 1) तुकाराम रुमालसिंह बारेला, रा.बोरी, जि.ब-हाणपुर, 2) धर्मेंद्र दुरसिंग बारेला, रा.ढेरीया, जि.खंडवा, 3) शांताराम बिल्लरसिंह बारेला, रा.हिवरा जि.ब-हाणपुर, 4) सुभाष प्रताप निंगवाल, रा.दहिनाला जि.ब-हाणपुर, 5) मस्तरीराम काशीराम बारेला, रा.न्हावी ता.रावेर आदींवर कारवाई केली आहे. यातील आरोपी धर्मेंद्र दुरसिंग बारेला, रा.ढेरीया, जि.खंडवा या आरोपीवर विविध कायदे व कलमान्वये 14 गुन्हे मध्यप्रदेश राज्यात दाखल असुन तो हिस्ट्रीशीटर आहे व मध्यप्रदेश राज्यातील 4 जिल्ह्यातून त्याला तडीपार करण्यात आले असल्याची माहिती कारवाई दरम्यान उघडकीस आली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा पोलीस स्टेशन ता.रावेर, जि.जळगाव येथे (दि.24एप्रिल) रोजी गु.र.नं 69/2024 भा.द.वि कलम 379 प्रमाणे व (दि.10जून) रोजी गु.र.न 108/2024 भा.द.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही गुन्ह्यातील एकुण 5 म्हशी कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेले बाबतच्या तक्रारीवरुन गुन्हे तपासावर घेण्यात आले होते. सदर गुन्हातील आरोपीचा शोध घेणे बाबत व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहा.पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते.
तेव्हा वरीष्ठांच्या आदेशानुसार निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि हरीदास बोचरे व तपासी अंमलदार पोहेकॉ ज्ञानेश्वर चौधरी, पोना अविनाश पाटील हे गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या करीत होते. दाखल गुन्ह्यात सपोनि बोचरे यांनी केलेल्या तांत्रिक तपास व अंमलदार यांच्या मदतीने 60 पेक्षा अधिक सि.सि.टी.व्ही कॅमे-यांची पडताळणी केली असता सदरील आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच आरोपीतांपैकी आरोपी नामे 1) तुकाराम रुमालसिंह बारेला, रा.बोरी, जि.ब-हाणपुर हा न्हावी, फैजपुर ता.यावल येथे असल्याबाबत खात्रीशीर माहीती सपोनि. हरिदास बोचरे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी लागलीच फैजपुर पो स्टे चे सपोनि निलेश वाघ यांना सदरची माहीती देऊन त्यांच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले होते. आरोपी तुकाराम याच्याकडे तपास केले असता इतर आरोपी मध्य प्रदेश राज्यात असले बाबत समजल्याने पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने सपोनि हरिदास बोचरे, पोहेकॉ.जाकीर पिंजारी, चापोहेकॉ. योगेश चौधरी, पोना.सुरेश पवार व पोकॉ. मयुर निकम व रावेर पो स्टे चे पोहेकॉ. ईश्वर चव्हाण, पोकॉ.सचिन घुगे असे शोध पथक मध्यप्रदेश राज्यात जाऊन आरोपी नामे 2) धर्मेंद्र दुरसिंग बारेला, रा.ढेरीया, जि.खंडवा, 3) शांताराम बिल्लरसिंह बारेला, रा.हिवरा जि.ब-हाणपुर, 4) सुभाष प्रताप निंगवाल, रा.दहिनाला जि.ब-हाणपुर, 5) मस्तरीराम काशीराम बारेला, रा.न्हावी ता.रावेर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन 11 म्हशी, 2 बोलेरो पिकअप व 2 मोटार सायकल असे एकुण 16,00,000/- रु. किं चे मुद्देमाल हस्तगत केले असुन त्यांची गुन्हाच्या अनषंगाने चौकशी केली असता त्यांनी निंभोरा पो स्टे येथील गु.र.न 69/2024, गु.र.न 108/2024, फैजपुर पो स्टे गु.र.न 97/2024, गु.र.न 137/2024, गु.र.न 151/2024 मुक्ताईनगर पोस्टे. गु.र.न 05/2024, गु.र.न 57/2024, रावेर पो स्टे गु.र.न 298/2024, सिल्लोड ग्रामीण पोस्टे. (जि. छत्रपती संभाजीनगर) गु.र.न 165/2024 व पंधाना पोस्टे. गु.र.न 122/2024 (जि.खंडवा, राज्य- मध्यप्रदेश) अशा ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील आरोपी धर्मेंद्र दुरसिंग बारेला, रा.ढेरीया, जि.खंडवा यावर विविध कायदे व कलमान्वये 14 गुन्हे मध्यप्रदेश राज्यात दाखल असुन तो पंधाना पोलीस स्टेशनचा जि.खंडवा येथील हिस्ट्रीशीटर आहे व मध्यप्रदेश राज्यातील ब-हाणपुर, खंडवा, खरगोन, हरदा या 4 जिल्ह्यातून त्याला तडीपार करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही निंभोरा पोस्टे. प्रभारी अधिकारी सपोनि हरीदास बोचरे, पोउपनि राजेंद्र पाटील, सफौ. ज्ञानेश्वर पाटील, चासफौ. अशरफ शेख, पोहेकॉ.स्वप्निल पाटील, पोना. सुरेश अढायगे, पोना. सुरेश पवार, पोकॉ.मयुर निकम, पोकॉ. किरण जाधव व पोकॉ. अमोल वाघ फैजपुर पोस्टे. प्रभारी अधिकारी सपोनि. निलेश वाघ, सफौ.विजय चौधरी, सफौ.देविदास सुरदास, पोहेकॉ.राजेश ब-हाटे, पोहेकॉ. महेंद्र महाजन, रावेर पोस्टे, पोहेकॉ. ईश्वर चव्हाण, पोकॉ. सचिन घुगे, स्था.गु.शाखा जळगाव येथील पोना. ईश्वर पाटील, पोकॉ. मिलींद जाधव, गौरव पाटील या तांत्रिक विश्लेषण पथकाने सि.सि.टी. व्ही फुटेज व इतर पुरावे गोळा करुन एकुण 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत.