पंधरा दिवसांपासून एरंडोल ग्रामीण रूग्णालयात सुमारे साडेचार हजार कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस शिल्लक..!

(शैलेश चौधरी)

एरंडोल:जवळपास दोन आठवड्यांपासून तालुक्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला असल्यामुळे एरंडोल ग्रामीण रूग्णालयात सुमारे साडेचार हजार तर ग्रामीण भागात अदमासे दिड हजार कोरोना लसींचे डोस शिल्लक असल्याची माहीती सूञांनी दिली आहे.
एरंडोल ग्रामीण रूग्णालयात रोज जेमतेम ५०ते१०० नागरीक कोरोनाप्रतिबंधक लसीचा डोस घेत आहेत तर उर्वरीत ग्रामीण भागात ४००ते५०० ग्रामस्थ लसींच्या डोसचा लाभ घेत आहेत.
विशेष हे की, यापूर्वी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जी झुंबड उडत होती व नागरीकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या ते चिञ आता धुसर झाले आहे.
लसीकरणाबाबत उदासिनता वाढली आहे की काय..? अशी जनमानसात चर्चा आहे.
दरम्यान, प्रत्येक नागरीकाला कोरोना लसीकरणाची सक्ती करावी,ज्या नागरीकांनी लस घेतली नसेल अश्या लोकांच्या शासकीय सवलती स्थगीत कराव्यात जेणेकरून लसीकरणाच्या मोहीमेस वेग प्राप्त होईल अशी सूज्ञ व सुजाण नागरीकांची भावना आहे.
एरंडोल तालुक्यात लसीकरण मोहीमेसाठी १लाख ३१हजारांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे त्यापैकी अद्याप फक्त ९५हजार एवढे लसीकरण झाले आहे.
लसीकरणापासून वंचित राहीलेल्या ३६हजार नागरीकांचा शोध घेण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात यावी अशी जाणकारांची अपेक्षा आहे.

Comments (0)
Add Comment