वास्तुपुरुषाची निर्मिती कशी झाली?
पौराणिक कथेनुसार एकदा देव आणि असुर यांच्यात भयंकर युद्ध झाले होते. अंधकारसुरासोबत युद्धावेळी भगवान महादेवाच्या कपाळावरून घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले, त्यातून एका विशालकाय प्राण्याचा जन्म झाला, याला वास्तुपुरुष या नावाने ओळखले जाते. विशालकाय असल्याने हा प्राणी ब्रह्मांडातील सर्व वस्तू खाऊ लागला, त्यामुळे देवता भयभीत झाले, आणि देवतांना या संसाराच्या बचावासाठी ब्रह्मदेवाची शरण घ्यावी लागली. त्यानंतर ब्रह्माने अष्ट दिकपालांना हा महाकाय प्राण्याला पडकण्याचे आदेश दिले. या प्राण्याचे डोके उत्तर-पूर्व तर तर पाय दक्षिण पश्चिम दिशेने असतील अशा प्रकारे याला पडकण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ब्रह्माने वास्तुपुरुषाच्या मध्यभागी अधिकार मिळवला आणि इतर ४४ देवतांना वास्तुपुरुषाच्या शरीरावरील इतर भागांवर अधिकार मिळवला. त्यानंतर या महाकाय प्राण्याने ब्रह्माला प्रश्न विचारला, ‘मी फक्त माझी भूक भागवत आहे, आणि मला कशाबद्दल शिक्षा दिली जात आहे, माझी निर्मितीच अशी झाली आहे, यात माझी काय चूक?’
वास्तुपुरुष
त्यानंतर ब्रह्माने या वास्तुपुरुषाला आशीर्वाद दिला, पृथ्वीवर कोणतीही संरचना बनली आणि या भूखंडाच्या मालकाने तुझी पूजा केली नाही तर ते संरचना तुझे भोजन बनले. तसेच जर ही संरचना तुझ्यानुसार केली असेल तर तुझ्यातील ४४ देवदेवता या संरचनेतील ऊर्जा क्षेत्रांचे रक्षण करतील. त्यानुसार वास्तुपुरुषाला ४५ ऊर्जाक्षेत्रात विभागलेले असते, याला वास्तुमंडल म्हटले जाते. वास्तुपुरुष तीन वेगवेगळ्या आकारांचा बनला आहे. त्यामध्ये वास्तू प्रतीक आहे विवेकाची, पुरुष प्रतीक आहे शरीराची आणि मंडल हा आत्म्याचे प्रतीक आहे.
वास्तुपुरुषाची ४५ ऊर्जाक्षेत्रात विभागणी
वास्तुपुरुषाच्या शरीराचा प्रत्येक अंग तुमचे शरीर आणि जीवनातील अशा भागांनी निर्देशित करते, जे घरातील विद्यामान ऊर्जेने प्रभावित होते. ईशान्य कोन डोक्याला प्रभावित करतो, हे स्थान वास्तुपुरुषाच्या मस्तिष्कच्या रूपाने दाखवले आहे. हा भाग संवेदनशील असतो, त्यामुळे घरातील हा भाग रिक्त ठेवला पाहिज. घरातील ज्या ठिकाणी काही अवजड अशी निर्मिती होऊ शकते, त्याला वास्तुपुरुषाच्या मांड्या आणि हातांच्या प्रतीकाने दाखवले आहे. वास्तुपुरुषाची नाभी ही घरातील ब्रह्माचे स्थाने आहे. जेव्हा आपण घराची निर्मिती करतो तेव्हा त्या जमिनीवर ४५ ऊर्जा क्षेत्रांची निर्मिती होते, जे एक प्रकारे वास्तुपुरुषाचे पूर्ण शरीर आहे.