महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
आंतरराज्यीय अट्टल घरफोड्या जळगाव पोलिसांच्या ताब्यात; ८ लाख ६४ हजारांचे सोने जप्त…
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास अन् तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर अट्टल घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय अट्टल घरफोड्याचा शोध घेऊन १२० ग्रॅम सोने ज्यांची किंमत ८ लाख ६४ हजार हे जप्त करून त्याला अटक केली आहे. सदर आरोपी हा आंतरराज्यीय अट्टल घरफोडी करणारा असुन त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये सुमारे ५४ पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी फिर्यादी – प्रकाश दत्तात्रय भोसले (वय ५९ वर्षे), धंदा-शेती रा.विद्यानगर भडगाव, ता.भडगाव यांचे फिर्याद वरुन अज्ञात आरोपी विरुध्द भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं. ३७१/२०२३ भादवी.क. ४५४,४५७,३८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (दि.१२डिसेंबर२०२३) रोजी सायकांळी ०५.४५ ते ०७.१५ वाजेच्या दरम्यान फिर्यादी – प्रकाश दत्तात्रय भोसले (वय ५९ वर्षे), धंदा-शेती रा.विद्यानगर, भडगाव ता.भडगाव हे घरी नसतांना त्यांचे राहते घराचे वरच्या मजल्यावरील जिन्याचे लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून घरातील बेडरुम मधील कपाटाचे लॉक तोडुन कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्क्म मिळुन एकुन १०,८६,४००/- रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणुन भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं. ३७१/२०२३ भादवी.क. ४५४,४५७,३८० प्रमाणे फिर्यादी – प्रकाश दत्तात्रय भोसले (वय ५९ वर्षे), धंदा-शेती रा.विद्यानगर भडगाव, ता.भडगाव यांचे फिर्याद वरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपास हा पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांचेकडे देण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, जळगाव, अपर पोलीस अधिक्षक सौ कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ, सहायक पोलीस अधिक्षक अभियसिह देशमुख, चाळीसगांव भाग यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ. किरण रवींद्र पाटील, पोकॉ. प्रवीण कडु परदेशी, पोकॉ. संदिप भटु सोनवणे यांनी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन सदर गुन्ह्याचा तपासात प्रशांत काशिनाथ करोशी (वय ३८), रा.हाऊस नं.२१ मौजे इस्पुर्ली ता.करवीर, जि.कोल्हापुर हा यांने चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यास वर्धा ता.जि. वर्धा येथुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने सदर घरफोडी, चोरी केल्याची कबुली देऊन चोरी करुन नेलेल्या सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्क्म पैकी १२० ग्रॅम सोने एकुण ८,६४,०००/- रुपयांचे काढुन दिल्याने ते रायपुर (छत्तीसगड) येथुन जप्त करण्यात आलेले असुन संशयीत आरोपी यास भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी चोरीच्या अनुषंगाने अधिक विचारपुस करुन इतर गुन्हे उघडकीस आणण्याकामी त्यास (दि.२५जून) रोजी ००.२५ वाजता अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास ०७ दिवासांची पोलीस कस्टडी रिमान्ड दिला आहे.
यातील सदर आरोपी हा आंतरराज्यीय अट्टल घरफोडी करणारा असुन त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये सुमारे ५४ पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी जळगाव, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, चाळीसगाव परिमंडळ, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर नारायण डोमाळे, पो.हे.काँ. किरण रवींद्र पाटील, पो.काँ. प्रवीण कडु परदेशी, पोकाँ संदिप भटु सोनवणे यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर नारायण डोमाळे हे करीत आहेत.