Akhilesh Yadav Parliamentary Speech : संविधान, सरकारी नोकऱ्या, EVM मशीन राहुल गांधींपाठोपाठ अखिलेश यादव कडाडले

नवी दिल्ली : सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. सोमवार ( 1 जुलै) रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, नीट परीक्षा प्रकरण, हिंदुत्व या मुद्दयावरुन केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. अशातच आज (2 जुलै) समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील सरकारी नोकऱ्या, संविधान,EVM मशीन या मुद्यांवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अखिलेश यादव यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

1) सरकार तरुणांना नोकऱ्या देऊ इच्छित नाही

अखिलेश यादव यांनी पेपरफुटीवरून प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, ”यूपीमध्ये प्रत्येक परीक्षेचा पेपर लीक झाला आहे. सरकार नोकऱ्या देऊ इच्छित नसल्याने पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. पेपरफुटीबाबत तुम्हाला जबाबदारीने उत्तर द्यावे लागेल. यूपीमध्ये झालेल्या सर्व स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक झाले होते. देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेचा पेपरही लीक झाला आहे. यावर कधी कारवाई करणार?”

2) अयोध्येत लोकशाहीचा विजय झाला

अखिलेश यादव पुढे म्हणाले की,‘होईही सोई जो राम रची राखा’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अयोध्येच्या विजयानेही हे सिद्ध केले आहे.अयोध्येतील जनतेने आणि प्रभू राम यांना आम्ही आणले असे म्हणणाऱ्यांचा पराभव केला आहे. हा लोकशाहीचा खरा विजय आहे”.

3) 4 जून हा जातीय राजकारणापासून मुक्तीचा दिवस

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अखिलेश यादव यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. तर 4 जून हा जातीय राजकारणापासून मुक्तीचा दिवस आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीने ज्या राजकारणाला छेद द्यायला हवा होता तोच मोडून काढला आहे. एकसंघ राजकारणाने आम्ही ही निवडणूक जिंकली आहे”.
Hindutva : आंबेडकर का म्हणाले – मी हिंदू म्हणून मरणार नाही, हिंदू-हिंदुत्वाची संपूर्ण कहाणी जाणून घ्या.

4) संविधानाचे रक्षण करणाऱ्यांचा विजय झाला

अखिलेश यादव पुढे म्हणाले की, ”राज्यघटना हे जीवनरक्त आहे, असे आपण मानतो. ज्यांनी संविधानाचे रक्षण केले त्यांचा विजय झाला. हा देश कोणाच्या वैयक्तिक आकांक्षेने चालणार नाही. तर तो जनतेच्या आकांक्षेने चालणार आहे. याचा अर्थ असा की आता देशात लोकांची इच्छाशक्ती चालेल, मनमानी नाही”.

5) पंतप्रधानांनी दत्तक घेतलेल्या गावांवर टीका

अखिलेश यादव हे पंतप्रधानांनी दत्तक घेतलेल्या गावांबद्दलही बोलले. ते म्हणाले की, ”पंतप्रधानांनी अनेक गावे दत्तक घेतली, पण या गावांचे चित्र बदलले नाही. आजही गावांची स्थिती तशीच आहे. कच्चे रस्ते, अचानक वीजपुरवठा खंडित होणे आणि खेड्यापाड्यात रिकामे सिलेंडर मिळणे अशा समस्या अद्यापही उद्भवत आहेत.

Source link

akhilesh yadavakhilesh yadav latest newsakhilesh yadav newsakhilesh yadav on bjpAkhilesh Yadav Parliamentary Speechअखिलेश यादवअखिलेश यादव संसद भाषणपावसाळी अधिवेशनसंसद पावसाळी अधिवेशन
Comments (0)
Add Comment