हाती आलेल्या माहितीनुसार, रतिभानपूर येथे भोले बाबा यांचे सत्संग सुरू होते. सत्संगच्या अखेरीस अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. ज्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ महिला आणि लहान मुले जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एटा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
रतिभानपूर येथील सिकंदराराऊच्या फुलराई गावात सत्संग महोत्सव सुरू होता. ही घटना तेव्हा घडली, असे एटा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीएमओंनी सांगितले. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला, असून मृतांमध्ये २५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या संख्येने जखमी लोकांना रुग्णालयात आणले जात आहे.
कशामुळे झाली चेंगराचेंगरी
या घटनेबद्दल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीमागे कोणत्याही प्रकारच्या अफवाचे वृत्त नाही. सुरक्षा रक्षकाने भक्तांना रोखले होते. ज्यामुळे अनेकांनी श्वास कोंडल्याची आणि गुदमरल्याची तक्रार केली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेचे वृत्त कळताच जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आयोजकांना कार्यक्रमासाठी परवानगी घेतली होती. पण त्यांनी जितकी संख्या सांगितली होती त्यापेक्षा अधिक लोक सत्संगासाठी आले होते.
मुख्यमंत्री योगींनी दिले आदेश
या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने घेतली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना रुग्णालयात जाऊन जखमींवर योग्य उपचार होतील याची काळजी घेण्यास सांगितले आहे. त्याच बरोबर एडीजी आग्रा आणि अलीगडचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.