आषाढी पालखी सोहळ्याकरीता ‘दगडूशेठ’ गणपती ट्�

पुणे,दि.०२ : – आषाढी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पुणे ते पंढरपूर वारी सेवेकरिता तीन सुसज्ज रुग्णवाहिका आणि दोन टँकर दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे पुण्यातून पाठविण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत ही वाहने रवाना झाली. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून होत असून दरवर्षी मोठया प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करुन या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियोजन करणारे डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांसह ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी, विनायक रासने, अंकुश रासने, संतोष रसाळ यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रुग्णवाहिकेसोबत डॉ. श्यामकांत गंभीर, ज्योत्स्ना राऊत, डॉ.अनिल साक्रिकर, डॉ.इंद्रवर्धन दोडीया, डॉ.अनुराधा गंभीर, डॉ. दर्शनी मेश्राम, डॉ.ॠषभ पोरवाल आदी ९ डॉक्टरांसह स्वयंसेवकांची टिम असणार आहे. उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष आहे.

डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे म्हणाले, सासवड मार्गे जाणा-या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत, लोणीमार्गे जाणा-या संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका व टँकर असणार आहेत. कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेत, आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरीत मिळाव्यात, याकरीता या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सहयोगी वैद्यकीय संस्थांतर्फे पालखी सोहळा ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास असतो, तेथे फिरता दवाखाना देखील चालविला जातो. यामध्ये त्वचा रोग, कान नाक घसा, नेत्र तपासणी, रक्तदाब, शर्करा तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येतात. तसेच औषधोपचार विनामूल्य दिला जातो. हजारो वारकरी दरवर्षी या आरोग्य सेवेचा लाभ घेतात.

 

Comments (0)
Add Comment