वर्धा पोलिसांनी गिरड परीसरात पकडली मोठी गांजाची खेप…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

वर्धा विशेष पथक,गुन्हे शाखा व गिरड पोलिसांनी संयुक्तिकरित्या केलेल्या कार्यवाहीत पकडला 102 किलो अंमली पदार्थ गांजा… 

गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(1)जुलै रोजी पोलीस अधिक्षक वर्धा व स्थानिक गुन्हे शाखा च्या टिमला वर्धा जिल्हयात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा येणार अशी माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक वर्धा यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे वेगवेगळी चार पथके तयार केली.

तसेच तयार करण्यात आलेल्या पथक हे दहा ते पंधरा दिवसापासुन  गुन्हे शाखेच्या टिमसोबत यावर काम करत होते अधिक माहीती घेतली असता पथकास गाडीचा नंबर मिळाला त्यावरुन  पोलिस स्टेशन गिरड व स्थानिक नागरिक यांचे मदतीने सहा ट्रॅक्टरचा वापर करुन गोपनिय माहीतीच्या आधारे गिरड पोलिस स्टेशनच्या परिसरात ट्रॅप लावुन कारचा 2 कि.मी. पाठलाग करुन MH 31 AE 1979 या मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कारला पकडले

त्यावेळी गाडीची पाहणी केली असता गाडीत 102 किलो गांजा मिळुन आला. कार व गांजासह सुरज राजकुमार वासेकर रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट हा मिळुन आल्याने 1) 102 किलो गांजा किंमत 20,47,200 /- रु 2) एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार MH 31 AE 1979 किमंत 5,00,000/- रु 3) एक ओपो मोबाईल फोन किं 10,000 रु असा ए  25,57,200/- रु मुद्देमाल जप्त करण्यात आला.व त्यावरुन पोलिस स्टेशन गिरड अप क्रं. 218/2024 कलम 8 (क), 20 (ब), ii (क), 29 NDPS ACT प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी सुरज राजकुमार वासेकर रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट याला अटक करण्यात आले पुढील तपास सुरु आहे.

सर्व पथकाचे पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी कौतुक केले असुन त्यांना 50 हजार रुपयाचे रिवार्डही पोलिस अधिक्षकांनी जाहीर केले

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक  नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात पोनि स्थानिक गुन्हे शाखा,सपोनि संतोष दरेकर, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि संदीप गाडे ठाणेदार पोलिस स्टेशन गिरड,पोउपनि अमोल लगड स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील कर्मचारी तसेच गिरड पोलिस स्टेशन येथील कर्मचारी यांनी केली

Comments (0)
Add Comment