Who Is Bhole Baba: पोलीस दलातील नोकरी सोडून सत्संग करणारे भोले बाबा आहेत तरी कोण?हाथरस चेंगराचेंगरीत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू

हाथरस: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. एटा येथील जिल्हा रुग्णालयात २३ महिला आणि २ लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना भोलो बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात झाली.

ताज्या माहितीनुसार आयोजकांकडून सांगण्यात आलेल्या संख्येपेक्षा जास्त लोक घटनास्थळी आले होते. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अनेकांना त्रास झाला आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र त्याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

कोण आहेत भोले बाबा

ज्या भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात ही घटना घडली ते एकेकाळी पोलिस विभागात काम करत होते. नोकरी सोडून त्यांनी प्रवचन करण्यास सुरुवात केली. एटा जिल्ह्यातील पटियाली गावातील रहीवासी साकार विश्व हरी हे पुढे भोले बाबा झाले. पोलिस दलातील गुप्तचर विभागात ते काम करत होते. काही वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी राजीनामा दिला आणि भक्तांच्या सेवेचे काम केले. भोले बाबा पत्नीसह सत्संग कार्यक्रम करत होते. त्यांचे सत्संग ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतात.
Hathras Accident: भोले बाबांचे सत्संग सुरू असताना झाली चेंगराचेंगरी; ७५ हून अधिक जणांचा मृत्यू

याआधी वादात सापडले

भोले बाबांचा सत्संग याआधी देखील चर्चेत आला होता. करोना काळात भोले बाबांनी सत्संगासाटी फक्त ५० लोकांना सहभागी होण्याची परवानगी मागितली होती. पण प्रत्यक्षात सत्संगासाठी ५० हजारहून अधिक लोक आले होते. प्रचंड संख्येने आलेल्या भक्तांमुळे प्रशासनाची धावपळ झाली होती. यावेळी देखील कार्यक्रमासाठी जितके लोक येणार असल्याचे सांगण्यात आले होते त्यापेक्षा जास्त संख्येने लोक आल्याची चर्चा आहे.

भोले भाबा यांच्या सत्संग दरम्यान झालेल्या या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा गर्दीच्या व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत. मर्यादीत लोकांसाठी परवानगी घेऊन मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

Source link

hathras satsang stampedeintelligence department in policewho is bhole babawho is saakar vishwa hariउत्तर प्रदेशभोले बाबाहाथरस येथे चेंगराचेंगरी
Comments (0)
Add Comment