व्हॉट्सॲप मेसेजखालचे घड्याळ
व्हॉट्सॲपची खरी ओळख हि एक ‘इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस’ अशीच आहे. पण मेसेजिंग सर्व्हिस वापरतांना आपण व्हॉट्सॲप चॅटबॉक्समध्ये कधी काही गोष्टी पाहतो ज्यांचा अर्थ कळत नाही आणि आपण गोंधळून जातो. जसे व्हॉट्सॲप मेसेज पाठवताना एक घड्याळ दिसल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. बहुतेक लोकांना हे का घडते हे समजत नाही. जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता तेव्हा तुम्हाला सिंगल टिक, डबल टिक किंवा ब्लू टिक हे समजू शकते, परंतु या घड्याळाचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊया.
मेसेज सध्या प्रोसेसमध्ये
WhatsApp वरील घड्याळाचे चिन्ह सामान्यत: रिसिव्हरला अद्याप डिलिव्हर न केलेल्या मेसेजच्या पुढे दिसते. हे सूचित करते की मेसेज सध्या प्रोसेसमध्ये आहे आणि डिलिव्हरी कन्फर्मेशनची प्रतीक्षा करत आहे.
घड्याळ तयार झाल्यानंतरचा विलंब
एकदा घड्याळ तयार झाल्यानंतर मेसेज डिलिव्हरीस उशीर होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी, रिसीव्हर डिव्हाइसची ऑफलाइन स्थिती किंवा WhatsApp च्या कोणत्याही सर्व्हर समस्या.
खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी
तुमच्या डिव्हाइसमध्ये खराब किंवा कमकुवत इंटरनेट कनेक्शन असल्यास, मेसेज पाठवण्यात तत्काळ विलंब होऊ शकतो, ज्यामुळे मेसेजच्या पुढे घड्याळाचे आयकॉन दिसू शकते.
सर्व्हर समस्या
व्हॉट्सॲपच्या कोणत्याही तात्पुरत्या सर्व्हर समस्येमुळे, मेसेज डिलिव्हर करण्यास विलंब होऊ शकतो, ज्यामुळे घड्याळ चिन्ह दिसण्यास सुरुवात होते.
रिसिव्हर ऑफलाइन
रिसिव्हरचे डिव्हाइस बंद असल्यास किंवा इंटरनेटशी कनेक्ट केलेले नसल्यास, डिव्हाइस ऑनलाइन परत येईपर्यंत WhatsApp मेसेज डिलिव्हर करू शकत नाही.