Samsung Galaxy M35 5G: 6,000mAh ची राक्षसी बॅटरी असलेला सॅमसंगचा फोन येतोय भारतात, तारीख ठरली

Samsung Galaxy M35 5G Exynos 1380 चिपसेटसह मे मध्ये जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता. आता सॅमसंग हा M-सीरीज स्मार्टफोन भारतात येणार आहे. अचूक लाँच तारीख न सांगता Amazon सह कंपनीनं देखील संकेत दिले आहेत की Samsung चा आगामी स्मार्टफोन देशात Amazon Prime Day Sale 2024 मध्ये सादर केला जाईल.

दरवर्षी प्रमाणे यंदाही Amazon सेल दरम्यान अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले जात आहेत. Galaxy M35 5G ची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील 6,000mAh ची बॅटरी. तसेच फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 nits पीक ब्राइटनेस लेव्हल असलेल्या AMOLED डिस्प्लेसह येईल.
iQOO Z9 Lite 5G: 6GB रॅमसह येतोय भारतात आयकूचा स्वस्त 5जी फोन भारतात; लाँच डेट आली समोर, किंमतीचाही खुलासा
Amazon Prime Day Sale 2024 चे टीजर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनं एक नवीन बॅनर लाइव्ह केला आहे, ज्यात दाखवण्यात आला आहे की Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन Amazon सेल दरम्यान, म्हणजे 20-21 जुलै दरम्यान लाँच केला जाईल. बॅनरमध्ये अ‍ॅमेझॉननं ‘Notify Me’ बटनचा समावेश केला आहे.

Samsung Galaxy M35 5G यंदा मे मध्ये डार्क ब्लू, ग्रे आणि लाइट ब्लू कलर ऑप्शनसह ब्राजीलमध्ये लाँच करण्यात आला होता. देशात याचा सिंगल 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत BRL 2,699 (जवळपास 43,400 रुपये) ठेवण्यात आली आहे. आशा आहे की Samsung भारतात देखील हा स्मार्टफोन या प्राइस सेगमेंटमध्ये लाँच करेल.

Samsung Galaxy M35 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M35 5G मध्ये 6.6 इंचाचा सुपर-अ‍ॅमोलेड डिस्‍प्‍ले देण्यात आला आहे. हा FHD+ रिजोल्यूशन ऑफर करतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1,000 निट्स आहे. गॅलेक्‍सी एम35 मध्ये इन-डिस्‍प्‍ले फ‍िंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

यात ड्युअल स्‍पीकर्स मिळतात. नवीन गॅलेक्‍सी फोनमध्ये 13 मेगापिक्‍सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनच्या मागे 50 मेगापिक्‍सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो OIS ला सपोर्ट करतो. यात 8 मेगापिक्‍सलचा अल्‍ट्रा-वाइड लेन्स आणि 2 एमपीचा मॅक्रो कॅमेरा देखील आहे.

Galaxy M35 5G अँड्रॉइड 14 आधारित One UI 6.1 वर चालतो. यात Samsung चा Exynos 1380 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आहे, जी 25W फास्‍ट चार्जिंगला सपोर्ट करते. परंतु चार्जर बॉक्‍स मध्ये मिळत नाही. Galaxy M35 5G मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी अनेक ऑप्शन आहेत. हा एक ड्युअल 5G सिम असलेला फोन आहे आणि Wi-Fi 6 ला सपोर्ट करतो.

Source link

amazon prime day 2024samsung galaxy m35 5gsamsung galaxy m35 5g priceसॅमसंग गॅलॅक्सी एम३५ ५जी भारतीय लाँच
Comments (0)
Add Comment