मुंबई- ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी ९५ कोटी ३ लाख रुपयांची भरघोस कमाई केली. मंगळवारी म्हणजेच सहाव्या दिवशी या चित्रपटाने तेलुगू भाषेत ११ कोटी २ लाख तर हिंदी भाषेत १४ कोटी रुपयांची कमाई केली. ‘कल्की 2898 एडी’च्या एकूण कमाई बद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाने संपूर्ण देशभरात ३७१ कोटी कमावले असून ६ दिवसात हिंदी भाषेमध्ये आतापर्यंत १४२ कोटी रुपये कमावले आहेत.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण प्रदर्शित झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल असं वाटलं होतं. मात्र, दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईमध्ये घट होत चालली आहे. पहिल्या दिवशी देशभरात ९५ कोटी ३ लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी मात्र ३७.७८ टक्क्यांची घसरण झाली असून पाचव्या दिवशी ६१ टक्क्यांनी घट झाली.

सहाव्या दिवशी नुकसान भरून काढले
‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाची सहाव्या दिवसाची कमाई बघता त्यात बरेच चढ-उतार दिसत आहेत. सहाव्या दिवशी देशभरात २७ कोटी ८५ लाख रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. सोमवारी ३३ कोटी १५ लाखांची कमाई केली असून या कमाईत १८.४५ टाक्यांची घसरण झालीये.
हिंदीपेक्षा तेलुगू भाषेत जास्त कमाई
Sacnilk रिपोर्टनुसार, ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने सहाव्या दिवशी तेलुगूमध्ये ११ कोटी २ लाख, हिंदीमध्ये १४ कोटी, तामिळमध्ये १ कोटी २ लाख, कन्नडमध्ये ०.२५ कोटी आणि मल्ल्याळममध्ये १ कोटी २ लाख रुपये कमावले आहेत. आतापर्यंत देशभरात एकूण ३७१ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. तेलुगूमध्ये १९३ कोटींची कमाई तर हिंदीमध्ये १४२ कोटींची कमाई केली.
‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने जगभरात ६२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, तरीही १००० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी या चित्रपटाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.