भोले बाबाचं आश्रम हे १८ ते १९ एकरात पसरलेलं आहे. जिल्ह्यात असं आश्रम दुसरं कुठलंच नाही. या आश्रमात बाबाने आपल्या अनुयायींच्या थांबण्यासाठी एक मोठं विश्रामगृह बनवलं आहे. या आश्रमात दररोज हजारोंच्या संख्येने लोक दर्शन घेण्यासाठी पोहोचतात. तर सणांच्या दिवशी मोठ्या प्रामाणात लोक येथे गर्दी करतात. सत्संग असेल नसेल तरी येथे नेहमी भक्तांची गर्दी पाहायला मिळते.
हातपंपातून पाणी नाही अमृत येतं
या बाबाच्या आश्रमात पिण्याचया पाण्यासाठी एक हात पंप लावण्यात आला आहे. याबाबत बाबाच्या भक्तांची मान्यता आहे की यातून येणारं पाणी हे फक्त पाणी नसून अमृत आहे. याचं पाणी भक्त स्नानासाठी तसेच पिण्यासाठी वापरतात. त्याशिवाय प्रसाद म्हणून ते घरीही घेऊन जातात. अनेक काळापासून या हातपंपाबाबत ही मान्यता आहे. याचं पाणी घेण्यासाठी लांबून लांबून लोक येत असतात.
मंगळवारी येथे खूप गर्दी असते. लोक बस, गाडी, ट्रेनने येथे पोहोचतात. मंगळवारच्या दिवशी पटियाला स्थानक आणि बहादुरा नरग मार्गावर खूप गर्दी असते. तर आसपास राहणारे नेहमीच आश्रमात येत जात राहतात.
दर मंगळवारी या आश्रमात भोले बाबा सत्संग करतात. यावेळीही भक्तांची मोठी गर्दी येथे असते. पण, गेल्या वर्षीपासून हे बंद करण्यात आलं आहे. गेल्या अनेक काळापासून भोले बाबा या आश्रमात आलेले नाही.
चेंगराचेंगरी आणि १२१ जणांचा मृत्यू
हाथरस येथे भोले बाबाचं सत्संग होतं. सत्संग संपल्यानंतर जेव्हा तो आपल्या गाडीत बसून जात होता, तेव्हा त्याच्या पायाखालची धूळ घेण्यासाठी लोक तुटून पडले. यामध्ये काहीजण खाली पडले तर इतर त्यांच्या अंगावर चढून पुढे गेले, त्यामुळे येथे मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, भोले बाबा हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.