Amol Kolhe: कोणी कल्पनाी केली नसेल, लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या…; शरद पवारांनी डॉ. अमोल कोल्हेंवर दिली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली: शिरुर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एक नवी आणि मोठी जबाबदारी दिली आहे. याची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी एक्सवरून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेतील उपनेता आणि मुख्य प्रतोदपदी अमोल कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल कोल्हे यांनी पोस्ट केली आहे. ते म्हणतात, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले.

पोस्टमध्ये पुढे डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे.
Hardik Pandya: हार्दिक पंड्या टॉप ऑफ द वर्ल्ड! आजवर एकाही भारतीय खेळाडूला जमलं नव्हतं ते करुन दाखवलं

लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सौ.सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार !, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आढळराव पाटील यांचा १ लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव केला होता. कोल्हे यांना ६ लाख ९८ हजार ६९२ मते मिळाली. याआधी २०१९ साली कोल्हे यांनी शिरूरमधून सर्व प्रथम विजय मिळवला होता. तेव्हा देखील कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० जागांवर निवडणुक लढवली होती त्यापैकी ८ ठिकाणी त्यांनी विजय मिळवला. राज्यातील ४९ पैकी काँग्रेसने सर्वाधिक १३, भाजपने ९, उद्धव ठाकरे गटाने ९, शरद पवार गटाने ८, शिंदे गटाने ७, अजित पवार गटाने १ तर एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला.

Source link

Amol Kolhedeputy leader and chief pratod of ncplok sabhsharadchandra pawarखासदार डॉ. अमोल कोल्हेशरद पवारशिरूर लोकसभा मतदारसंघ
Comments (0)
Add Comment