मोबाईल होस्टेलमध्येच सोडून दोघी गायब
ग्वालियर येथील टेकनपूच्या बीएसएफ अकादमीत असलेल्या २ महिला कॉन्स्टेबल आकांशा निखार आणि शहाना खातून या ६ जूनला अत्यंत रहस्यमय पद्धतीने गायब झाल्या. याप्रकरणी बीएसएफकडून दोघी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आकांशा ही मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राहणारी आहे. तर, शहाना ही पश्चिम बंगाल येथील आहे. पोलिसांच्या मते दोन्ही महिला कॉन्स्टेबल आपले मोबाईल अकादमीच्या हॉस्टेलमध्ये सोडून बेपत्ता झाल्या आहेत.
आकांशा ही २०२१ तर शहाना ही २०२३ पासून बीएसएफमध्ये तैनात आहेत. दोन्ही टेकनपूर बीएसएफ अकादमीत चांगल्या मैत्रिणी झाल्या. मार्च महिन्यात शहाना आकांशाच्या घरी जबलपूरला गेली होती. तेथून या दोघी पश्चिम बंगाल फिरायला गेल्या. तेव्हा आकांशा ही शहानाच्याच घरी थांबली होती.
६ जून २०२४ ला रात्री ग्वालियरच्या टेकनपूर बीएसएप अकादमीतून फोन आला, त्यांनी विचारलं की आकांशा घरी आहे का, तेव्हा त्यांना माहिती झालं की त्यांची मुलगी शहानासोहत बेपत्ता आहे, असं आकांशाच्या आईने सांगितलं.
लास्ट लोकेशन पश्चिम बंगाल
मिळालेल्या माहितीनुसार, ७ जूनला त्या दोघांचं लोकेशन हे बंगालच्या हावडाचं होतं. त्यानंतर त्यांनी बहरामपूर रेल्वे स्थानकावर रात्री साडे अकराच्या सुमारास एका ऑटो रिक्षा चालकाच्या मोबाईचा वापर केला. येथून शहाना आपली बहीण, भावोजी आणि बहिणीच्या दिरासोबत आकांशा घेऊन करीमपूरच्या मजलिसपूर गवी गेली. त्यानंतर या दोघींचा काहीही पत्ता नाही.
याप्रकरणी आपल्या मुलीला शोधण्यासाठी आकांशाची आई उर्मिला या १३ जूनला मुर्शिदाबादला पोहोचल्या. १४ जूनला त्यांनी शहाना कुटुंबाला आकांशा जिथे कुठे असेल तिथला पत्ता देण्यात सांगितलं, पण त्यांनी काहीही सांगिंतलं नाही, असं आकाशांच्या आईने सांगितलं.
त्यानंतर उर्मिला यांनी शहानावर आकांशाच्या अपहरणाचा आरोप लावला आहे. त्यामुळे आकांशासोबत काहीतरी अनुचित घडल्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, याप्रकरणात ग्वालियर पोलिसांची मदतही मागितली आहे. पोलिसांनी उर्मिला निखार यांना कारवाईचं आश्वासन दिलं आहे.