pune-शहरात दिवसा व रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी केले अटक

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

Pune Online News – पुणे शहरात दिवसा व रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे, आरोपीकडून तीन गुन्हे उघडकीस आणून दीड लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण दोन लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई वारजे परिसरात करण्यात आली. अतुल चंद्रकांत आमले (वय-26 रा. तिरुपती नगर, आकाशनगर जकात नाक्याजवळ, वारजे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने वयाच्या 13 व्या वर्षापासून ते आजपर्य़ंत पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच शेजारच्या जिल्ह्यात तब्बल 35 घरफोडीचे गुन्हे केले आहेत.कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथक दिवसा झालेल्या घरफोडी गुन्ह्यांचा तपास करत होते. त्यावेळी येवलेवाडी येथे रात्री झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना घटनास्थळाच्या बाजूचे तसेच आरोपी येण्या-जाण्याच्या मार्गावरील 150 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी दोन जण पल्सर दुचाकीवरुन जाताना दिसले. पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन त्यांचा शोध घेत असताना आरोपी अतुल आमले हा त्याच्या घराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या घराजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.आरोपी अतुल आमले याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येवलेवाडी येथे रात्री तसेच काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलारेवाडी व सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिल कॉलेज चौकात दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली.

कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सतिश चव्हाण, गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर,पोलीस अंमलदार शाहीद शेख, संतोष बनसुडे, सुजित मदन, सागर भोसले यांच्या पथकाने केली.

Comments (0)
Add Comment