हाथरस चेंगराचेंगरी: १२१ जणांच्या मृत्यूवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया; मी तर सत्संगच्या आधीच निघालो होतो

हाथरस: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२१ जणांच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी याचे प्रवचनानंतर ही मंगळवारी ही घटना घडली होती. या प्रकरणी २४ तासानंतर प्रथमच भोले बाबाने प्रतिक्रिया दिली आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेवर आपल्याला दुख:झाल्याचे सांगत बाबाने काही समाजकंटकांनी गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याचा दावा केला.इतक नाही तर आपण त्यांच्या विरोधात कायदेशी कारवाई करू असे ते म्हणालेत. भोले बाबाने वकीलामार्फत प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, चेंगराचेंगरीत ठार झालेल्या व्यक्तींबद्दल मला अतिशय शोक आहे. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.
Who Is Bhole Baba: पोलीस दलातील नोकरी सोडून सत्संग करणारे भोले बाबा आहेत तरी कोण?हाथरस चेंगराचेंगरीत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू

बाबाने असा दावा केला आहे की, २ जुलै रोजी सत्संग सुरू होण्याच्या खुप आधी मी फुलारी गावातून निघालो होतो. या प्रकरणी ज्या लोकांनी गोंधळ घातला त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी वकील डॉ.एपी सिंह यांची नेमणूक केली आहे.


८० हजार लोकांच्या जागी आले दीड लाखाहून अधिक

हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी सत्संगचे आयोजन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कार्यक्रमासाठी ८० हजार लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. पण प्रत्यक्षात दीड लाखाहून अधिक लोक आले होते. FIRमध्ये भोले बाबाच्या नावाचा समावेश नाही. आयोजकांवर येणाऱ्या भक्तांची संख्या लपवणे, वाहतूक व्यवस्थापनाला मदत न करणे आणि चेंगराचेंगरीचे पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे.

FIRनुसार दुपारी दोन वाजता भोले बाबा गाडीतून निघाले तेव्हा गाडी ज्या मार्गावरून जात होती तेथील माती भक्तींनी उचलण्यास सुरुवात केली. गर्दी अचानक वाढली आणि माती उचलण्यासाठी जे खाली बसले होते ते इतरांच्या पाया खाली आले. हा सर्व प्रकार सुरू असताना आयोजन समिती आणि सुरक्षा रक्षकांनी गर्दीला रोखले ज्यामुळे आणखी गोंधळ उडाला.

Source link

bhole bababhole baba first reactionHathars Bhole Baba Newshathras incidentभोले बाबाहाथरस
Comments (0)
Add Comment