भारताची पहिली सौर मोहीम ‘आदित्य-L1’ अंतराळयानाने सूर्य आणि पृथ्वीच्या L1 पॉइंट म्हणजेच लॅन्ग्रेस पॉइंटभोवती आपली पहिली प्रभामंडल कक्षा पूर्ण केली आहे. भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) ही माहिती दिली आहे. लॅग्रेंज पॉइंट 1 चे अंतर पृथ्वीपासून सूर्याकडे 1.5 दशलक्ष किलोमीटर आहे. हे ते ठिकाण आहे जिथे आदित्य L-1 सूर्यप्रकाशात होत असलेल्या ॲक्टिव्हिटीजचा मागोवा घेत आहे. आदित्य एल-१ अंतराळयान गेल्या वर्षी २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. 6 जानेवारी 2024 रोजी, ते L1 बिंदूच्या प्रभामंडल कक्षेत दाखल झाले.
काय आहे सूर्य-पृथ्वीचा L1 बिंदू
L1 बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. येथून सूर्यावर नेहमी लक्ष ठेवता येते. आदित्य स्पेसक्राफ्टने आपल्यासोबत 7 वैज्ञानिक उपकरणे घेतली आहेत. हे सर्व स्वदेशी आहेत आणि भारतातील विविध विभागांनी तयार केलेली आहेत. यंत्राच्या सहाय्याने सूर्याच्या विविध भागांचा अभ्यास केला जात आहे.
L1 बिंदूभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 178 दिवस
इस्रोचे म्हणणे आहे की हॅलो ऑर्बिटमधील आदित्य एल-1 अंतराळ यानाला एल-1 बिंदूभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 178 दिवस लागतात. इस्रोने सांगितले की हेलो कक्षेत फिरत असताना आदित्य एल-1 अनेक शक्तींच्या संपर्कात येतो, त्यामुळे ते कक्षेबाहेर जाण्याची शक्यता असते.
Aditya L1 चा मार्ग तीनवेळा बदलला
इस्रोने सांगितले की आदित्य-L1 चा मार्ग 22 फेब्रुवारी आणि 7 जून रोजी या कक्षा राखण्यासाठी दोनदा बदलण्यात आला. मंगळवारी तिसऱ्यांदा असे केले गेले जेणेकरुन अंतराळयान L1 भोवती दुस-या प्रभामंडल कक्षेत प्रवास करत राहील.
काय आहे उद्देश Aditya L1 चा
या मोहिमेचा उद्देश सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि कोरोनाचा अभ्यास करणे हा आहे. ही भारतातील पहिली अंतराळ आधारित वेधशाळा आहे. कोरोनल मास इजेक्शन, सोलर फ्लेअर यांसारख्या सूर्यामध्ये घडणाऱ्या घटनांवर आदित्यची विशेष नजर आहे.