समोर लेकीचा मृतदेह, नातू अजूनही बेपत्ता; दुर्घटनेनंतर नातलग शोधासाठी सैरभैर

हाथरस : ज्येष्ठ नागरिक असलेले छेदीलाल आपली ३५ वर्षीय मुलगी रूबीच्या मृतदेहाला कवटाळून रुग्णवाहिकेत आक्रोश करीत होते… बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय नातवाची चिंताही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती… हे दृश्य आहे हाथरसच्या जिल्हा रुग्णालयाच्या शवागाराबाहेरचे.हाथरस येथे भोलेबाबा यांच्या सत्संगादरम्यान मंगळवारी चेंगराचेंगरी होऊन शंभरहून अधिक जण मृत्युमुखी पडले. याच घटनेत छेदीलाल यांनी आपल्या मुलीला गमावले आहे. त्यांची मुलगी रूबी मूळची उन्नावची रहिवासी असून, आपल्या वडिलांकडे रायबरेली येथे आली होती. गावातील लोक बसने सत्संगाला निघाले होते. त्यांच्यासोबत तीसुद्धा आपल्या पाच वर्षांच्या मुलाला घेऊन सत्संगाला गेली होती. तिथे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तिचा मृत्यू झाला; तर तिचा मुलगा अजूनही बेपत्ता आहे. छेदीलाल आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन उन्नावला गेले. हाथरस, अलीगड, सिकंदराराऊ, आग्रा आणि एटा येथे रूबीच्या पाच वर्षीय मुलाचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता असलेल्यांच्या शोधासाठी त्यांचे नातलग धडपड करीत आहेत.
भाजपची स्ट्रॅटर्जी वापरुन शिंदेंचा नवा डाव, मोठ्या भावाच्या जागांवर घाव, महायुतीत ठिणगी?

भाऊ अजूनही बेपत्ता

अलीगडमधून आलेल्या मोहारसिंह यांच्या कुटुंबावरही संकट कोसळले आहे. त्यांचे ६५ वर्षीय भाऊ राधेश्याम हेसुद्धा सत्संगाच्या कार्यक्रमानंतर बेपत्ता आहेत. मोहारसिंह आपल्या भावाचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत. मात्र, त्यांना अजूनही भाऊ सापडलेला नाही. आपला भाऊ जिवंत असल्याची आशा त्यांना आहे. आग्रा, अलीगड आणि एटा येथे शोध घेतल्यानंतर ते बुधवारी हाथरस जिल्हा रुग्णालयात आले. तिथेही त्यांच्या हाती निराशाच आली. राधेश्याम यांचा फोनही बंद लागत आहे.

आईचा मृतदेह मिळाला

अलीगडच्या यतेंद्रसिंह यांची आई सूरजवती भोलेबाबांच्या सत्संगाला आली होती. चेंगराचेंगरीनंतर त्याही बेपत्ता होत्या. यतेंद्रसिंह आईचा ठिकठिकाणी शोध घेत होते. सिंकदराराऊ, अलीगड आणि एटा येथील रुग्णालयांमध्ये शोधल्यानंतर ते पहाटे पाच वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तेथील जखमींच्या वॉर्डात ते आईला शोधत होते. मात्र, तिथेही आई न सापडल्याने ते जड पायांनी शवागाराकडे गेले. एकेक मृतदेह पाहत असताना अखेर त्यांच्यासमोर आई सूरजवतीचा मृतदेह आला आणि तो पाहून त्यांनी टाहो फोडला.

Source link

hathras accidenthathras bholebaba sastanghathras newsहाथरस चेंगराचेंगरीहाथरस दुर्घटनाहाथरस बातम्या
Comments (0)
Add Comment