पृथ्वीसाठी धोक्याची घंटा? पाच वर्षात संकट धडकणार अन्… ISRO प्रमुखांकडून महत्त्वाची माहिती

मुंबई: सायबेरिया येथील सुदूरच्या तुंगस्का येथे ३० जून १९०८ ला झालेल्या धुमकेचा हवेत झालेल्या स्फोटाने जवळपास २,२०० चौरस किलोमीटरवरील जंगल उध्वस्त झालं होतं. यामध्ये जवळपास ८० मिलियन झाडं नष्ट झाली होती. आता असाच एक धोका पुन्हा पृथ्वीवर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पृथ्वीच्या जवळचा धुमकेतू ज्याला आताच्या काळातला सर्वात धोकादायक धुमकेतू जे ३७० मीटर व्यासचा एपोफिस हा १३ एप्रिल २०२९ ला आणि मग २०३६ ला पृथ्वीच्या जवळून जाईल.

यासारख्याच प्रभावाने डायनासोर नामशेष झाले होते, असं सांगितलं जातं. जगभरातील स्पेस एजन्सी सध्या पृथ्वीला या धूमकेतूपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इस्रोही यासाठी या जागतिक कार्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे.

जर पृथ्वीवर असं काही झालं तर आपण सगळे नामशेष होऊ – एस सोमनाथ

याबाबत इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं की, ‘आपलं आयुष्य हे ७०-८० वर्षांपर्यंत असतं आणि आपण आपल्या जीवनात ही अशी कुठलीही घटना बघितलेली नाही. त्यामुळे आपण असं समजुया की हे शक्य नाही. जर तुम्ही जग आणि ब्रम्हांडाचा इतिहास पाहिला तर याप्रकारच्या घटना नेहमी होत असतात. ग्रहाकडे अशा प्रकारचे धुमकेतू येणे आणि त्यांचा प्रभाव होत असतो. मी गुरु ग्रहावर धुमकेतू धडकताना पाहिला आहे. शुमेकर-लेव्हीची धडक पाहिली आहे. जर पृथ्वीवर अशी कुठली घटना होणार असेल तर आपण सर्व नामशेष होऊ’.

‘या सर्व फक्त शक्यता आहेत. आपल्याला स्वत:ला त्यासाठी तयार करावं लागेल. पृथ्वीसोबत असं काही व्हावं अशी आमची इच्छा नाही. मानवता आणि सर्व प्राणी येथे राहावे, पण आम्ही याला थांबवू शकत नाही. आपल्याला याचे पर्याय शोधावे लागतील. पण, आमच्याकडे एक पर्याय आहे ज्याने याची दिशा बदलू शकते’.

‘आपण पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या धुमकेतूला शोधू शकतो आणि त्याला पृथ्वीपासून लांब पाठवू शकतो. कधी-कधी हे अशक्यही होऊ शकतं. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या विकसित होण्याची गरज आहे. त्याची दिशा बदलण्यासाठी तेथे जड प्रॉप्स पाठविण्याची क्षमता, निरीक्षणात सुधार आणि प्रोटोकॉलअंतर्गत इतर देशांसोबत एकत्र काम करावं लागेल’, असंही एस सोमनाथ यांनी सांगितलं.

Source link

Asteroidearthisrolatest science newsscience newsSpace Newsइस्रो प्रमुख एस सोमनाथधुमकेतू पृथ्वीवर धडकणारपृथ्वीचा विनाशपृथ्वीसाठी धोक्याची घंटा
Comments (0)
Add Comment