इस्लामाबाद शहरातील राहणीमान स्वस्त
अहवालातील माहितीनुसार, अबुजा, लागोस आणि इस्लामाबाद सारख्या शहरांमध्ये राहणीमान सर्वात स्वस्त असल्याचे आढळून आले आहे.
परदेशी नागरिकांसाठी मुंबई महागडे शहर
भारताबद्दल बोलायचे झाले तर मुंबई 136 व्या क्रमांकावर आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 11 स्थानांनी पुढे आहे. म्हणजेच मुंबई आता परदेशी नागरिकांसाठी भारतातील सर्वात महागडे शहर बनले आहे. दिल्ली शहर चार स्थानांनी प्रगती करत 165 व्या स्थानावर पोहोचले आहे. तर बेंगळुरूची सहा स्थानांनी घसरण 189व्या स्थानी आली आहे तर चेन्नईची पाच स्थानांनी घसरण झाली असून 195व्या स्थानावर आली आले आहे. त्या पाठोपाठ हैदराबाद 202 व्या, पुणे 205 व्या आणि कोलकाता 207 व्या स्थानावर आहे.
‘बेस’ सिटी म्हणून न्यूयॉर्कची गणना
मर्सर हे जगभरातील 226 शहरांमध्ये राहण्याच्या खर्चाचे मूल्यांकन करत असते. हा अहवाल निवास, वाहतूक, अन्न, कपडे आणि मनोरंजनासह 200 हून अधिक उत्पादने आणि सेवांची तुलना करत सर्वे करतो. अशातच नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात न्यूयॉर्क शहर हे ‘बेस’ सिटी म्हणून गणले गेले आहे.
शहर महाग कशामुळे होते?
चलनवाढ, चलनातील चढ-उतार, आर्थिक आणि भू-राजकीय अस्थिरता आणि संघर्षात वाढ यासारखे अनेक घटक जगण्याच्या खर्चात वाढ होण्यास कारणीभूत आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हाँगकाँगसारख्या शहरात महागडी घरे, वाहतुकीचा उच्च खर्च, महागड्या वस्तू आणि सेवा ही प्रमुख कारणे आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.
महागड्या शहरांमध्ये युरोपचे वर्चस्व
सर्वात महागड्या शहरांच्या टॉप 10 यादीतील बहुतांश शहरे युरोपमधील आहेत. त्यानंतर कोपनहेगन (11वा), व्हिएन्ना (24वा), पॅरिस (29वा), ॲमस्टरडॅम (30वा) आणि लंडन (8वा) आहे. दक्षिण अमेरिकेत उरुग्वे (42 व्या) क्रमांकावर आहे. तर दुबई मध्य पूर्वेमध्ये (15व्या) क्रमांकावर आहे. उत्तर अमेरिकेतील प्रमुख शहर न्यूयॉर्क हे सातव्या स्थानावर आहे.
दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये काय फरक आहे?
दिल्ली आणि इस्लामाबाद या दोन वेगवेगळ्या देशांच्या राजधानी असल्या तरी, दोन्ही दक्षिण आशियातील समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात. दिल्लीची अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रावर, तर इस्लामाबादची शेती आणि उद्योगावर आधारित आहे. दिल्लीची स्थापना ८व्या शतकात झाली. तर, इस्लामाबाद 1960 च्या दशकात नियोजित शहर म्हणून बांधले गेले. दोन्ही शहरे, आपापल्या देशांच्या राजधानी असल्याने, राजकीय आणि प्रशासकीय केंद्रे आहेत.