मूलांक 1 – वडिलांच्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्या
मूलांक 1 असलेल्यांना आजचा दिवस फार चांगला आहे. वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सरकारी कामाशी संबंधित असलेले व्यावसायिक प्रस्ताव येतील. आज तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटेल पण बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. आज पचनशक्ती बिघडू शकते. उपाय म्हणून सूर्याला जल अर्पण करावे, त्यातून लाभ होईल. आज वडिलांच्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्या.
मूलांक 2 – सन्मान मिळेल
मूलांक 2 असलेल्यांसाठी आजची वेळ अनुकूल आहे. आईवडिलांचे सहकार्य मिळेल. तुमच्या नावाची ख्याती होईल. तुम्हाला आज धनलाभाचे योगही आहेत. तुम्हाला सन्मान मिळण्याची संधी प्राप्त होईल. कुटुंबीयांसोबत सुखद संबंध राहतील. कुटुंबीयांसोबत प्रेमाचा व्यवहार फायद्याचा राहील.
मूलांक 3 – अविचाराने सल्ला देऊ नका
मूलांक 3 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या ज्ञानवर्धक बोलण्याचे आज कौतुक होईल. तुमचा सल्ला घेऊन लोक कामे करतील. एखाद्या सरकारी शिक्षण संस्थेशी जोडून घेण्याचा विचार कराल. एकूण आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल. पण आज अविचाराने कोणालाही सल्ला देऊ नका, कारण यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचू शकतो.
मूलांक 4 – सरकारची नोटीस येईल
मूलांक 4 असलेल्यांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. तुम्हाला सरकारची एखादी नोटीस येईल, असे प्रतीत हो आहे. वडिलांची प्रकृती बिघडू शकते. पैशाशी संबंधित विषयात अडचणी येतील. मानहानी झाल्याने तुमचे मन विचलित होऊ शकते. जोडीदारासोबत नीट राहाणे फायद्याचे ठरेल.
मूलांक 5 – गुंतवणूक विचारपूर्वक करा
मूलांक 5 असलेल्यांना वेळ अनुकूल राहील. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या नियोजनावर काम करण्याची संधी आज मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल राहील. पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करा, अन्यथा पैसे अडकू शकतात. बहीण किंवा मुलीचा सल्ला घेऊन गुंतवणूक केली तर ती लाभाची ठरेल.
मूलांक 6 – वादविवादापासून दूर राहा
मूलांक 6 असलेल्यांना आजचा दिवस सामान्य राहील. आज कार्यक्षेत्रातील कोणत्याही वादविवादापासून दूर राहा. भांडणापासून शक्य तितके लांब राहाल. कार्यक्षेत्रातील एखादी व्यक्ती तुमच्याशी वाद घालू शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्यावरील नियंत्रण गमावू शकता. त्यामुळे तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही आज शांत राहावे. घरीही वादविवाद होऊ शकतात. वडील, बहीण, मुलगी यांच्याशी संबंध चांगले ठेवा. त्यांच्याशी सल्लामसलत करूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत.
मूलांक 7 – अडचणी दूर होतील
मूलांक 7 असलेल्यांसाठी आज अडचणी दूर होतना दिसत आहेत. पण वडिलांच्या प्रकृतीबद्दल सचेत राहिले पाहिजे. आज खर्च वाढू शकतात आणि मानसिक तणावही वाढेल. आज मुलाच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे, त्याला काही आजार होऊ शकतात. आज कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याकडे बोट दाखवू शकते, त्यामुळे कोणतेही कटू शब्द वापरू नका.
मूलांक 8 – कामात अडचणी येतील
मूलांक 8 असलेल्यांना आज वेळ ठीक नाही. आज प्रत्येक कार्यात बऱ्याच अडचणी येतील आणि संकटांना तोंड द्यावे लागेल. आज सूर्याल जलअर्पण केल्याने तणाव कमी होईल. तसेच आज शनिदेवा अंबा अर्पण केला तर चांगले लाभ होतील आणि मानसिक शांती मिळेल. आज हृदयाची गती वाढू शकते, त्यामुळे तुम्ही विचलित व्हाल. कुटुंबात आज काही कारणांमुळे वादविवाद होतील, अशा वेळी तुम्ही मौन बाळगत, रागावर नियंत्रण ठेवावे.
मूलांक 9 – नशिबाची साथ राहील
मूलांक 9 असलेल्यांना आज नशिबाची पूर्ण साथ राहील. तुम्ही विचार केलेली सर्व कामे पूर्ण होण्याचे योग बनत आहेत. प्रकृती आणि आर्थिक बाबतीत आज अडचणी येतील, पण या अडचणी समान्य असतील. आज तुम्ही एखाद्या कामात अग्रेसर राहाल, त्यामुळे दिवसभर प्रफुल्लित राहाल. आईवडील, आणि मुलांचे प्रेम लाभेल.