मा माली…. बाप तेली…. बेटे निकले सय्यद अली ! तेली

पुणे,दि.०५:- लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मनसे नेते प्रकाश महाजन यांची जीभ घसरली. राहुल गांधी यांचा हिंदू धर्माशी काय संबंध? मा माली…बाप तेली…बेटे निकले सय्यद अली…अशी त्यांची अवस्था असल्याचे वादग्रस्त विधान महाजन यांनी केले.

दरम्यान त्यांच्या या विधानानंतर माळी आणि तेली समाजात संतापाची लाट उसळली असून प्रकाश महाजन यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावर अनिर्बंध बोलू लागले आहेत. हिंदू हे हिंसक असतात असं जनरल स्टेटमेंट त्यांनी केले. त्यांचा आमच्या हिंदू धर्माशी काय संबंध? नाही ते बापाकडून हिंदू, नाही आईकडून हिंदू तरी ते हिंदूवर कसे बोलतात. त्यांच दत्तात्रय गोत्र कुठून आलं. ग्रामीण भागात म्हण आहे आई एका जातीची बाप एका जातीचा आणि अवलाद दुसऱयाच जातीची जन्माला आली. माली…बाप तेली…बेटे निकले सय्यद अली…अशातला तो प्रकार आहे, असे वादग्रस्त विधान प्रकाश महाजन यांनी राहुल गांधींवर टीका करताना केले. बृहन्महाराष्ट्र तेली व माळी समाजाने महाजन यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी तेली व माळी समाजाची माफी मागावी अशी मागणी संताजी प्रतिष्ठान कोथरूडच्या वतीने करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांनी अनुसरून सर्व पदाधिकारी सभासद यांच्याशी संवाद साधला. यापुढे तेली समाजाचा अपमान करणाऱ्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल. तेली समाज हे कदापि सहन करणार नाही. पुढील धोरण लवकरच ठरवले जाईल. असे मीटिंगमध्ये ठरविण्यात आले

Comments (0)
Add Comment