बाबांच्या सुरक्षेसाठी महिला-पुरुष सुरक्षारक्षक
बाबांनी आपल्या सुरक्षेसाठी पुरुष आणि महिला रक्षक नेमल्याची बातमी अलीकडेच आली आहे. हे लोक एकाच प्रकारचे कपडे घालायचे. बाबांना प्रवचनस्थळी जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. बाबांच्या ताफ्याशिवाय कोणालाही रस्त्यावर येण्याची परवानगी नाही.
13 एकर जमिनीवर आश्रम
मैनपुरीच्या बिछवा येथे भोले बाबाचा आश्रम असल्याची माहिती समोर आली आहे. आश्रमाची किंमत कोट्यावधी रुपयांत असून अलीगड जीटी रोडवर 13 एकर जागेवर हा आश्रम बांधला आहे. त्याचबरोबर बाबांकडे आलीशान गाड्यांचा ताफा देखील आहे.
विविध राज्यांमध्ये बाबांचे आश्रम
मिळालेल्या माहितीनुसार, बाबांच्या मुख्य आश्रमाव्यतिरिक्त उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्येही आश्रम आहेत. कासगंज, आग्रा, कानपूर, शाहजहांपूरसोबतच ग्वाल्हेरमध्येही बाबांचा आश्रम आहे. बाबांचे आश्रम असलेल्या सर्व शहरांमध्ये वेगवेगळे ट्रस्ट आणि विश्वस्त आहेत.
देणगीदारांची यादी गेट समोर लावली
बाबांना दान केलेल्या 200 मोठ्या देणगीदारांची यादी आश्रमाच्या गेटवर लावलेली आहे. या यादीत सर्वाधिक जमीन देणाऱ्या विनोद बाबूंचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आणखी १९९ नावे आहेत, ज्यांनी २ लाख ५१ हजार ते दीड लाख रुपये, १ लाख, ८० हजार, रुपये ५० हजार, २५ हजार, ११ हजार आणि १० हजार रुपयांची देणगी दिली आहे.
भगव्या कपड्यांऐवजी बाबा घालतात सूट-बूट
भगवा घालण्याऐवजी बाबा सूट-बूट आणि टाय घालतात, असे सांगण्यात आले. तसेच महागडी घड्याळे आणि महागडे चष्मे घालून भक्तांना आशीर्वाद देतात.
शाळेत मुलांऐवजी बाबांच्या प्रचाराचे साहित्य
मैनपुरीमध्ये बाबांच्या आश्रमासमोर अर्धवट बांधकाम झालेली शाळा आहे. त्या शाळेत बाबांच्या प्रचाराचे साहित्य आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. बाबांच्या सत्संगासाठी लावलेल्या मंडपाच्या वस्तू, त्यांची पोस्टर्स, ठिकठिकाणी लावलेली होर्डिंग्ज आणि कार्यकर्त्यांसाठी त्या खोल्या वापरल्या जात आहेत.