महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
वर्धा जिल्हा व ईतर जिल्हयातून मोटारसायकल चोरी करून ईतर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीस जेरबंद करून 18 मोटार सायकल केल्या जप्त,आर्वी गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कार्यवाही…,
आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी मेघराज चंपालालजी संतलेजा वय 42 वर्ष. रा गणपतीवार्ड आर्वी ता. आर्वी जिल्हा वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की त्यांनी त्यांची HERO कंपनीची ISMART मोटारसायकल क्र MH-32. AA- 2924 जीचा चेसीस क्र MDLHA12ACE9E06726 हा असुन ती दि. 08/11/2023 चे 00/00 ते दि. 09/11/2023 चे 06/00 वा चे दरम्यान हे आपले घरासमोर उभे करून झोपले व सकाळी उठून पाहीले असता त्यांना त्यांचे घरासमोर उभी करून ठेवलेली मोटार सायकल दिसुन आली नाही,यावरुन ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अशा तक्रारीवरुन पोलिस स्टेशन आर्वी येथे अपराध क्र. 88/2024 कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून, दि 02.07.2024 रोजी एक इसम मौजा धनोडी येथे चोरीची मोटारसायकल विक्री करीता घेवुन येत आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरुन पोलिस स्टेशन आर्वी येथील गुन्हे प्रकटी करण पथकाने सापळा रचुन यातील संशयीत आरोपी नयन मिलींद गायकवाड वय 19 वर्ष रा, कोसुर्ला ता. हिगणघाट जि वर्धा याचे ताब्यातून त्याने चोरी केलेली मोटार सायकल काळया रंगाची HONDA कंपनिची UNICORN मोटार सायकल कि. अंदाजे 70,000/ रूची जप्त केली.
सदर आरोपीस पुढील कार्यवाही करीता ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन आर्वी अपराध क्र. 88/2024 कलम 379 भादवि मधील गणपतीवार्ड आर्वी येथिल चोरीस गेलेली HERO कंपनिची
ISMART मोटर सायकल क MH-32. AA – 2924 बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की त्याने त्याचे ईतर साथीदारांसह सदरची मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने तसेच वर्धा जिल्हयातुन पोलिस स्टेशन आर्वी, सेवाग्राम, सावंगी मेघे, अल्लीपुर, खरांगणा सेलु येथुन अंदाजे 15 ते
20 मोटार सायकली चोरी करून कामरगाव जि. वाशिम येथील साथीदारांना विक्री केल्याचे सांगितले यावरुन तात्काळ पोलिस अधिक्षक यांचे आदेशान्वये पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन आर्वी यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन आर्वी येथिल गुन्हे प्रकटीकरण पथक कामरगाव जि. वाशिम येथे रवाना करून त्यांनी आरोपी 1) नयन मिलींद गायकवाड वय 19 वर्ष रा, कोसुर्ला ता.हिंगणघाट जि वर्धा 2) साहील विठठल डोंगरे वय 19 वर्ष रा, येसंबा ता, जि, वर्धा 3) सययद सलमान सय्यद साबीर वय 22 वर्ष रा, मसला कामरगाव ता, कारंजा जि, वासीम 4) मोहम्मद फैजल मोहम्मद फिरोज वय 20 वर्ष रा, कामरगाव ता, कारंजा जि, वाशिम तसेच दोन विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 4 मोटारसायकल जप्त करून आरोपी क्र. 01 ते 04 यांची विद्यमान न्यायालयाकडुन पोलिस कोठडी प्राप्त करून दरम्यान आरोपींचे ताब्यातुन कामरगाव ता. कारंजा जि. वाशिम येथुन 13 मोटर सायकली जप्त केल्या.
अशा वर्धा जिल्हा व ईतर जिल्हयातुन चोरीस गेलेल्या एकुण 18 मोटारसायकली कि. 13,50,000/- रू. च्या जप्त करण्यात आल्या असुन यातील आरोपी 1) नयन मिलींद गायकवाड वय 19 वर्ष रा, कोसुर्ला ता. हिंगणघाट जि वर्धा 2) साहील विठठल डोंगरे वय 19 वर्ष रा, येसंबा ता, जि, वर्धा + दोन विधी संघर्षित बालके तसेच चोरलेली मोटारसायकल विकत घेणाऱ्या आरोपी 1)सय्यद सलमान सय्यद साबीर वय 22 वर्ष रा, मसला कामरगाव ता, कारंजा जि, वाशिम 2) मोहम्मद फैजल मोहम्मद फीरोजवय 20 वर्ष रा, कामरगाव ता, कारंजा जि, वासीम यांना ताब्यात घेण्यात आले
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरूल हसन, अपर पोलिस अधिक्षक,डॅा.सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी आर्वी देवराव खंडेराव यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे ठाणेदार पो. स्टे. आर्वी यांचे मार्गदर्शनात पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा रामकिसन कासदेकर, दिगांबर रूईकर, अमर हजारे,नापोशि प्रविण सदावर्ते, पोशि राहुल देशमुख, निलेश करडे, स्वप्नील निकुरे यांनी केली.